डिव्हिलियर्सच्या निवृत्तीबाबत दक्षिण आफ्रिकेचा मोठा खुलासा


दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आपली निवृत्ती मागे घेणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून समोर येत होत्या. पण आता या वावड्यांना पूर्णविराम मिळाला आहे. डिव्हिलियर्स आपली निवृत्ती मागे घेणार नसल्याचे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून २३ मे २०१८ रोजी अचानक निवृत्तीची घोषणा करणाऱ्या डिव्हिलियर्सने यंदाच्या आयपीएलमध्ये बंगळुरूकडून चांगली कामगिरी केली होती. ७ सामन्यात त्याने दोन अर्धशतकांसह २०७ धावा केल्या होत्या. त्याने यात १६ चौकार आणि १० षटकार ठोकले होते. या हंगामा दरम्यान त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुनरागमनाविषयी चर्चा रंगली होती.