आयसीएमआरचा कोविड उपचारांमधून Plasma Therapy वगळण्याचा निर्णय


नवी दिल्ली : कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी गेल्या काही काळापासून प्लाझ्मा थेरेपीचा वापर केला जात होता. रुग्णांना या उपचारपद्धतीमुळे मोठी मदत मिळत असल्याचेही सांगण्यात येत होते. पण, आयसीएमआरने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या प्रौढ वयोगटातील रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांमधून प्लाझ्मा थेरेपीला वगळ्यात येत आहे. कोरोनाबाधितांवर प्लाझ्मा थेरेपी फारशी प्रभावी नसल्याची माहिती आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

त्याचबरोबर कोरोनाबाधितांवरील उपचारांच्या प्रक्रियेला आयसीएमआरकडून तीन भागांमध्ये विभागण्यात आले आहे. यामध्ये कमी लक्षण असणारे रुग्ण, मध्यम लक्षण असणारे रुग्ण आणि गंभीर लक्षणे असणारे रुग्ण असे तीन गट करण्यात आले आहेत. कमी स्वरुपात कोरोनाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना गृह विलगीकरणात राहण्याचा सल्ला आयसीएमआरने दिला आहे. तर, मध्यम आणि गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांना अनुक्रमे कोविड कक्ष आणि आयसीयूमध्ये दाखल करण्याचे आयसीएमआरकडून सांगण्यात आले आहे.