न्युयॉर्क मध्ये मिळणार दिवाळी सुट्टी

न्युयॉर्क मध्ये दीर्घकाळ भारतीय समुदायाकडून केली जात असलेली दिवाळी निमित्त शाळांना सुटी देण्याची मागणी लवकरच पूर्ण होणार असल्याचे समजते. न्युयॉर्क असेंब्लीत भारतीय वंशाच्या पहिल्या महिला सदस्य राजकुमार यांनी या संदर्भात विधेयक सादर केले असून त्याला व्यापक समर्थन मिळाले आहे. त्यामुळे हे विधेयक सहज पास होईल असे सांगितले जात आहे. असेच विधेयक न्युयॉर्क राज्य सिनेटर केविन थॉमस यांनी राज्य पातळीवर मांडले आहे. केविन हे एकमात्र भारतवंशी सिनेटर आहेत.

हे विधेयक संमत झाले की पूर्ण अमेरिकेत शाळांना दिवाळीच सुटी देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या वर्षी न्युयॉर्कच्या प्रतिष्ठित एम्पायर बिल्डिंगवर दिवाळी निमित्त नारंगी रंगात रोषणाई केली जाणार आहे. या राज्यात भारतीय वंशाच्या अमेरिकन लोकांची संख्या वाढती आहे त्यामुळे शाळांना दिवाळी सुट्टी द्यावी यासाठी अनेक प्रस्ताव आले आहेत असे समजते.

अमेरिकेचे अध्यक्षीय निवासस्थान व्हाईट हाउस येथे दिवाळीला अगोदरच सण म्हणून मान्यता दिली गेली आहे. बराक ओबामा आणि त्यांच्या नंतर झालेले अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी दिवाळी निमित् व्हाईट हाउस मध्ये दिवे उजळविले होते. २०१६ मध्ये दिवाळी वर एक टपाल तिकीट सुद्धा जारी केले गेले आहे. न्युयॉर्क मध्ये राहणाऱ्या भारतीयांची संख्या ७,११,१७४ आहे. अमेरिकेची बहुतेक सर्व राज्ये न्युयॉर्कच्या पावलांवर पाउल टाकतात असे सांगितले जाते. त्यामुळे न्युयॉर्क मध्ये दिवाळी सुटी मिळाली तर पूर्ण अमेरिकेत त्याचे अनुकरण केले जाईल असे मानले जात आहे.