इरफान पठाणची अतिसुंदर पत्नी सफा बेग

टीम इंडियाचा एके काळाचा स्टार खेळाडू इरफान पठाण आणि त्याची पत्नी सफा यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर इरफानने शेअर केले आहेत. मात्र सर्व फोटो मध्ये सफा हिजाब मध्ये आहे त्यामुळे तिचे असली सौंदर्य फारसे कुणाला पाहता आलेले नाही. सफाचे असेच काही न पाहिलेले फोटो वेगाने व्हायरल झाले आहेत.

इरफान आणि सफा यांची ओळख कुठे आणि कशी झाली याची माहिती बाहेर आलेली नाही. पण असे सांगतात या दोघांची पहिली भेट दुबई येथे झाली होती. त्यानंतर दोन वर्षे डेटिंग केल्यावर २०१६ मध्ये दोघांनी अतिशय साधेपणाने मक्का येथे विवाह केला. या दोघांना एक मुलगा आहे.

सफा आणि इरफान यांच्यात दहा वर्षाचे अंतर आहे. सफाचा जन्म २८ फेब्रुवारी ९४ चा. सौदीतील जेद्दा जिल्ह्यातील अजीजीया या गावी ती लहानाची मोठी झाली. तिचे वडील उद्योजक आहेत. इंटरनॅशनल इंडियन शाळेत तिचे शिक्षण झाले आहे. सफाने मॉडेल म्हणून प्रसिद्धी मिळविली होती. मिडिल ईस्ट आशिया मध्ये ती मॉडेल म्हणून प्रसिध्द होती आणि तिचे अनेक फोटो फॅशन मॅगेझीन मध्ये झळकले आहेत. तिने संपादक म्हणूनही काम केले आहे. विशेष म्हणजे ती उत्तम नेल आर्टिस्ट असून फ्लिकर नावाचे तिचे एक पेज आहे.

सफाचे स्वतःच्या नावावर सोशल मिडिया अकौंट नाही असेही समजते.