शार्पने आणला १ इंची कॅमेरा सेन्सरवाला अॅक्वोस आर ६ स्मार्टफोन

जपानी कंपनी शार्पने जगातील पहिला १ इंची कॅमेरा सेन्सर असलेला नवा स्मार्टफोन अॅक्वोस आर ६ सादर केला आहे. या फोनला अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर सह टू फिंगर अनलॉकिंग फिचर दिले गेले आहे. शार्पने जगातील पहिल्या १ इंची इमेज सीएमओएस सेन्सर साठी लायका शी भागीदारी केली आहे. हा सेन्सर मागच्या जनरेशन सेन्सर पेक्षा पाचपट अधिक मोठा आहे आणि उत्तम फोकस पॉवर असलेला आहे. कमी उजेडात हायस्पीड ऑटोफोकस करण्यासाठी यात लेझरचा वापर केला गेला आहे.

या फोनसाठी ६.६ इंची ओलेड स्क्रीन, १२ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज, अँड्राईड ११ ओएस दिली गेली असून तो वॉटर, डस्ट प्रूफ आहे. कॅमेऱ्यामध्ये २०.२० एमपीचा प्रायमरी कॅमेरा आहे तर दुसरा कॅमेरा १२.६ एमपीचा एलईडी फ्लॅश सह आहे. अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट स्कॅनर मुळे युजरला चांगली सुरक्षा मिळते शिवाय टू फिंगर ऑथेंटीकेशन पेमेंट, अकौंट मॅनेजमेंट सुरक्षा देते असा कंपनीचा दावा आहे. फोनची किंमत समजू शकलेली नाही.