ब्रिटीश कंपनीचा चीन मध्ये आहे सर्वात मोठा सेक्स डॉल कारखाना

करोना मुळे अनेक देशात लॉकडाऊन लागलेला आहे. गेले कित्येक दिवस मित्र परिवार, कुटुंबीय यानाही अनेक जण भेटू शकलेले नाहीत. या परिस्थितीत सेक्स डॉल कल्चर वेगाने वाढताना दिसून आले आहे. सोशल मीडियावर चीन मधील जगातील सर्वात मोठ्या सेक्स डॉल कारखान्याचे फोटो वेगाने व्हायरल झाले आहेत. ब्रिटीश कंपनी लव्हडॉलसचा हा जगातील सर्वात मोठा कारखाना चीनच्या झोंगशेन भागात आहे.

या कारखान्यात सेक्स डॉल्सची अनेक मॉडेल बनविली जातात. विशेष म्हणजे चीन व्यतिरिक्त जगाच्या अन्य देशातूनही या बाहुल्यांना प्रचंड मागणी आहे. अमेरिका आणि युरोपीय देशात या बाहुल्याना मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे एका बाहुलीची किंमत किमान दीड लाख रुपये असून बाहुलीमध्ये जेवढे फिचर्स जास्त तेवढी किंमत वाढते. या बाहुल्यांची ऑनलाईन डिलीव्हरी दिली जाते.

चीन मध्ये सुद्धा या बाहुल्यांना खूप मागणी आहे. येथे नवनवीन तंत्रज्ञान वापरून सेक्स डॉल बनविल्या जातात. आता थ्री डी स्कॅन डॉल उपलब्ध आहेत तसेच एआय तंत्रज्ञान वापरून बनविलेल्या बाहुल्याही उपलब्ध आहेत. चीन मध्ये तरुणांपासून वयोवृध्द नागरिकांपर्यंत सर्व थरातील ग्राहक या बाहुल्या विकत घेतात असे सांगितले जाते. सध्या एलियन डॉलना खूप मागणी आहे. मोठे कान, मोठे डोळे असलेल्या या बाहुल्या महाग आहेत. यापुढे जाऊन श्वास घेणाऱ्या बाहुल्या सुद्धा येथे बनविल्या जात आहेत असे समजते.