सर्वात प्रथम दिल्लीतील DRDO रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना दिले जाणार अँटी कोविड ड्रग 2DG


नवी दिल्ली – सोमवारी डीआरडीओचे कोरोनारोधी औषध 2-DG आपातकालीन वापरासाठी लाँच करण्यात आले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यावेळी उपस्थित होते. हे औषध आता कोरोनाबाधितांना दिले जाऊ शकते. हे औषध पावडरच्या स्वरूपात असून सर्वात प्रथम हे औषध दिल्लीतील DRDO कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना दिले जाईल.

DRDO च्या इंस्टीट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड साइंसेसने (INMAS) हे औषध डॉ. रेड्डीज लॅबोरेट्रीजसोबत मिळून तयार केले आहे. क्लीनिकल रिसर्चदरम्यान 2-डीजी औषधाच्या 5.85 ग्रामचे पाऊच तयार करण्यात आले. याचे एक-एक पाऊच सकाळी आणि संध्याकाळी पाण्यात मिसळून दिले जातात. याचे चांगली परिणाम दिसून आले आहेत. ज्या रुग्णांना हे औषध दिले, त्यांच्यात वेगाने रिकव्हरी होत आहे. या आधारावर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या औषधाला परवानगी दिली आहे.