ह्युंदाईच्या नेक्सोने हायड्रोजन सह नोंदाविले नवे रेकॉर्ड

ऑस्ट्रेलियात ह्युंदाई कारने हायड्रोजन इंधनासह नवे रेकॉर्ड नोंदविले आहे. ह्युंदाई ऑस्ट्रेलिया टीमने रॅली ड्रायव्हर ब्रेंडन रीव्ह्जसह हे रेकॉर्ड नोंदविले आहे. त्यांनी सिंगल टँक हायड्रोजन सह मेलबोर्न ते ब्रोवेन हिल हा ९०० किमीचा प्रवास न थांबता करून वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. मागचे रेकॉर्ड याच ह्युंदाई नेक्सोच्या नावावर असून बर्टन पिकार्ड यांनी ते बनविले होते. पिकार्ड फ्रांस एरोनॉट व सोलर इम्पल्स फौंडेशनचे अध्यक्ष आहेत. त्यावेळी नेक्सोने ७७८ किमीचा प्रवास केला होता.

नेक्सोने झिरो इमिशन वाहन म्हणूनही मान्यता मिळविली आहे. नेक्सो ही हायड्रोजन इंधनावर चालणारी पहिली ऑस्ट्रेलियन कार आहे. ती अधिकृत सिंगल चार्ज मध्ये ६६० किमी जाते. तीन ते पाच मिनिटात ही कार चार्ज होते. नवे रेकॉर्ड बनविताना सर्व प्रवास नॉन स्टॉप १३ तास ६ मिनिटात केला गेला. हा प्रवास सरासरी ६६.९ किमी वेगाने झाला असेही सांगितले गेले आहे.