रिअलमी ८, फाईव्ह जी चे स्वस्त व्हेरीयंट आले

रियलमी ८, फाईव्ह जी चे नवे स्वस्त व्हेरीयंट बाजारात आले आहे. ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेजच्या या व्हेरीयंटची किंमत १३९९९ रुपये आहे. भारतीय बाजारातील हा सर्वात स्वस्त फाईव्ह जी स्मार्टफोन आहे. गेल्याच महिन्यात  रिअलमीने रिअलमी ८, फाईव्ह जी चे ४ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज असे दोन फोन भारतीय बाजारात सादर केले आहेत.

नव्या व्हेरीयंट मध्ये ६.५ इंची फुल एचडीएल प्लस डिस्प्ले, ड्रॅगनट्रायल ग्लास प्रोटेक्शनसह दिला गेला आहे. ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. त्यात प्रायमरी कॅमेरा ४८ एमपीचा असून दुसरा २ एमपीचा मोनोक्रोम सेन्सर तर तिसरा २ एमपीचा पोर्ट्रेट सेन्सर आहे. नाईट स्कॅप, प्रो मोड, एआय स्कॅन, सुपर मॅक्रो फिचरसह हे कॅमेरे आहेत. सेल्फी साठी फ्रंटला १६ एमपीचा कॅमेरा आहे. साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, युएसबी टाईप सी पोर्ट दिले गेले आहे. ५ हजार एमएएचची फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी बॅटरी आहे. हा फोन १८ मे पासून फ्लिपकार्ट तसेच ऑफलाईन स्टोर्समध्ये मिळू शकणार आहे.