मनी प्लांट ची गोष्ट..


मनी प्लांट ला त्याचे नाव कसे मिळाले याची एक खूप आगळी गोष्ट आहे. तैवान मध्ये राहत असलेल्या एका अग्रीब माणसाने ईश्वराकडे खूप प्रार्थना केली आणि त्याचे दारिद्र्य दूर होईल असा काही तरी चमत्कार देवाने करावा असे त्याने देवाला विनविले. देवाने ही त्याला तसा आशीर्वाद दिला. दुसऱ्या दिवशी त्या माणसाला त्याच्या घराच्या अंगणात त्याला एक नवीन रोप उगविलेले दिसले. देवाचा आशीर्वाद समजून त्या माणसाने त्या रोपाची चांगली राखली. लवकरच ते रोप चांगले फोफोवले. त्या रोपापासून पुढे अनेक नवी रोपे जन्माला आली. ही रोपे बाजारात विकून त्या माणसाने आपले दारिद्र्य दूर केले आणि त्याच्या घरामध्ये पैश्याची भरभराट झाली आणि त्याच्या सगळ्या विवंचना दूर झाल्या. म्हणूनच घरामध्ये सुख नांदावे, भरभराट असावी या करिता मनी प्लांट चे रोप देण्याची पद्धत पडली असावे.

मनी प्लांट हे घराच्या आतमध्ये किंवा बाहेर दोन्ही कडे लावले जाऊ शकते. याची पाने जराशी गोलसर दिसतात आणि खूप लवकर फोफावतात. या झाडांना फारश्या निगेची आवश्यकता नसते. या झाडाला फारसे पाणी सुद्धा द्यावे लागत नाही. मनी प्लांट वर्षभर हिरवे राहते. मनी प्लांट कुंडीत लावले, किंवा याची वेळ इतर झाडांवर चढवलेली सुद्धा सुंदर दिसते.

फेंग शुई या वास्तुशास्त्र च्या प्रकारामध्ये मनी प्लांट चे महत्व सांगितले गेले आहे. फेंग शुई च्या अनुसार मनी प्लांट घरातील हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते.हवेचे शुद्धीकरण करून हवेमधील ऑक्सिजन वाढविण्याचे काम मनी प्लांट करत असते. वस्तू तज्ञांच्या मते घरामधील झाडे किंवा रोपे आपल्याला पॉझिटिव्ह उर्जा प्रदान करतात. विशेषकरून मनी प्लांट घरामध्ये लावले असल्यास घरामधल्या अदैद्चानी दूर होउन घरामध्ये सुबत्ता नांदते असे मानले जाते. मात्र्स घरामध्ये पाळीव प्राणी असलयास त्यांना मनी प्लांट पासून दूरच ठेवावे. कारण त्यांनी जर मनी प्लांट खाल्ले तर ते त्यांच्यासाठी विषबाधा करणारे ठरू शकते.

Leave a Comment