सर्वेक्षणात समोर आले फ्रेंच किसमुळे होतो हा गंभीर आजार


सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनसारखे गंभीर आजार असुरक्षित संबंधांमुळे होऊ शकतात. ‘गॉनोरिया’ या नावाचा आजारसुद्धा याच कारणामुळे होऊ शकतो. हा रोग जगभरात सामान्य आहे, जो बहुतेकांना होतो. वास्तविक पाहात असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे हा आजार पसरतो. पण या आजाराबाबत अलिकडेच करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जोडीदाराला किस केल्याने ‘गॉनोरिया’ हा आजार पसरत असल्याची धक्कादायक माहिती या सर्वेक्षणामध्ये समोर आली आहे. या आजाराचे विषाणू जोडीदाराला किस करताना तुमच्या शरीरारत प्रवेश करतात. ज्याचा दुष्परिणाम सर्वात पहिले तुमच्या घशावर पडतो. ‘सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन’ या नावाच्या मासिकात यासंदर्भात प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, फ्रेंच किस करताना आणि दीर्घकाळापर्यंत चुंबन घेताना हा आजार पसरतो. तो बायसेक्शुअल म्हणजेच समलिंगी संबंध ठेवणाऱ्यांनासुद्धा होऊ शकतो. रेक्टम, गळा आणि डोळ्यांवर या आजाराचा प्रभाव पडतो. कोणतेच औषध अंगी लागत नसल्याने ‘गॉनोरिया’ हा आजार असाद्य मानला जातो.

लोकांना जोडीदारासोबत सुरक्षित संबंध प्रस्थापित करण्याच्या सूचना जन आरोग्य संघटनांनी यासंदर्भात दिल्या आहेत. वास्तविक पाहात दिर्घकाळापर्यंत फ्रेंच किस केल्याने हा आजार पसरत असल्याने, याबाबत केवळ सल्ला देणे पुरेसे नसल्याचे शोधकर्त्यांनी म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियातील मेलर्बन येथे या संदर्भात 2016-17 मध्ये सार्वजनिक आरोग्य सेवा देणाऱ्या संघटनांनी 3100 समलिंगी संबंध ठेवणाऱ्यांच्या रक्ताची तपासणी केली. त्यानंतर ‘गॉनोरिया’ हा आजार हेट्रोसेक्शुअल्सच्या तुलनेत बायसेक्शुअल लोकांमध्ये जास्त प्रमाणात पसरत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment