कुत्र्याच्या नावामुळे मालकाला १० दिवसांचा तुरूंगवास!


सर्वात इमानदार प्राणी असे जर तुम्हाला कोणी विचारले तर साहजिकच तुम्ही कुत्रा असे सांगाल. पण आम्ही आज तुम्हाला जी बातमी सांगणार आहोत, ज्या कुत्र्याच्या इमानदारीमुळे नाहीतर त्याच्या नावामुळे चक्क मालक गोत्यात आला आहे. या मालकाला १० दिवसांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या घटनेबाबत असे सांगितले जात आहे की, चीन सरकार आणि सरकारच्या सिव्हिल सर्व्हिस अधिकाऱ्यांच्या नावावर या व्यक्तीने त्याच्या कुत्र्यांची नावे ठेवली होती आणि त्याला याचीच शिक्षा मिळाली आहे.

बेन असे चीनमध्ये राहणाऱ्या या ३० वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी गेल्या सोमवारी नोटीस पाठवली होती. सोशल मीडिया नेटवर्क व्ही चॅटवर बेनने एक पोस्ट शेअर केली होती. त्याने यात सांगितले होते की, Chengguan आणि Xieguan अशी त्याने त्याच्या कुत्र्यांची नावे ठेवली आहेत. यातील पहिले नाव हे छोटे-मोठे गुन्हे निपटवणाऱ्या अधिकाऱ्यांशी संबंधित आहे. तर दुसरे सिव्हिल सर्व्हिसमध्ये ट्रॅफिक असिस्टंट म्हणूण काम करणाऱ्या अधिकाऱ्यांशी संबंधित आहे. चीनमध्ये कायद्याने अशी नावे अवैध मानली जातात.

बेन ने सांगितले की, हे नावे अवैध आहेत हे मला माहिती नव्हते. या नावांमध्ये मला ह्यूमर दिसल्यामुळे कुत्र्यांची ही नावे मी ठेवली. पण यात काही ह्यूमर पोलिसांना दिसला नाही आणि त्यांनी कारवाई केली. एका पोलीस अधिकाऱ्याने बिजिंग न्यूजसोबत बोलताना सांगितले की, सोशल मीडियात डॉग ब्रिडरची पोस्ट लोकांना भडकवणारी होती आणि याने देशाच्या-शहराच्या व्यवस्थेसाठी नुकसानकारक असल्यामुळे आम्ही त्याच्यावर कारवाई केली. आता १० दिवसाच्या तुरूंगावासाची शिक्षा बेन याला सुनावण्यात आली आहे. दुसरीकडे ही बातमी समोर आल्यावर सोशल मीडियातून लोकांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.

Leave a Comment