सडपातळ होण्यासाठी खाण्याचे नियोजन

diet
वजन कमी करण्यासाठी अन्न कमी खाल्ले पाहिजे किंवा ते जास्त खाल्ले तरी त्याच्यामुळे अधिक उष्मांक प्राप्त होता कामा नये. असा सर्वसाधारण सल्ला वजन वाढलेल्या लोकांना दिला जातो. बरेच लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता आपल्या मनानेच आपल्या आहाराचे टाईमटेबल आणि नियोजन करत असतात. असे असले तरी या स्वतः ठरवलेल्या नियोजनाने वजन घटतेच असे नाही. तेव्हा काही आहारतज्ञांनी वजन कमी करण्यासाठी एक वेगळा प्लॅन दिलेला आहे.

१. एक घास ३२ वेळा चावा ः- आपल्या पूर्वजांनी एक घास ३२ वेळा चावण्याचा सल्ला दिलेला आहे. त्याचा आपल्याला विसर पडला आहे आणि आपण भराभर खायला लागलो आहोत. थोडेसे चर्वण करून पाण्यासह घास गिळण्याची आपल्याला घाई झालेली आहे. परंतु ही घाई टाळून घास चांगला चावून खाण्याची सवय लावली तर अन्न अंगी लागते आणि त्यातल्या फार कमी कॅलरीज पोटात जातात. २. ब्रेकफास्ट टाळू नका ः- हा सल्ला तर अनेकदा दिला गेलेला आहे. आपल्या शरीराच्या आणि मेंदूच्या पोषणासाठी अन्न लागते आणि त्या अन्नाचा सर्वात मोठा पुरवठा ब्रेकफास्टच्या खाण्यातून होत असतो. ब्रेकफास्ट केला नाही तर दुपारची भूक लवकर लागते आणि कामाचा वेग कमी होतो.

३. खाद्यावर लक्ष द्या ः- आपण जे अन्न खात आहोत त्यावर लक्ष केंद्रीत करणे हे उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असल्याचे तज्ञांचे मत आहे. सध्या लोकांना खूप घाई झाल्यामुळे ते जेवताना वृत्तपत्रे वाचतात, बहुसंख्य लोक टी. व्ही. पाहतात. परंतु त्यामुळे त्यांचे लक्ष खाद्यावरून उठते आणि त्याचा पचनावर परिणाम होतो. ४. अन्न जास्त शिजवू नका ः- अन्न फार शिजवले गेल्यास त्यातील पोषण द्रव्ये आणि जीवनसत्त्वे यांचा नाश होतो आणि निकस जेवण घेतल्यास थोड्यावेळाने लगेच भूक लागते आणि त्यामुळे जाडी वाढत जाते. कमी शिजवलेले किंबहुना न शिजवलेले अन्नच अधिक पोषक असते आणि ते वजनावर नियंत्रण ठेवते.

५. जेवणापूर्वी फलाहार ः- जेवणाच्यापूर्वी फळे खाणे हे योग्यच आहे. परंतु फळे खाल्ल्यानंतर ३० मिनिटांनी जेवावे. आधी फळे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि वजन घटते. ६. थोड्या थोड्या वेळाने जेवा ः- ज्याला खरोखर वजन कमी करायचे असेल त्याने दर दोन-तीन तासाला असे दिवसातून ५ ते ६ वेळा जेवण घ्यावे. त्यामुळे कार्यक्षमताही टिकते आणि वजनही घटते. ७. रात्री जेऊ नका ः- खरे म्हणजे आरोग्याचा नियम असा आहे की संध्याकाळी ७ च्या आधी जेवण घ्यावे आणि नंतर झोपेपर्यंत काही खाऊ नये. आजच्या काळात हे अव्यवहार्य आहे. म्हणून निर्धार करून रात्री ८ नंतर कधीही जेऊ नये.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment