असे देश, असे विचित्र कायदे


अमेरिका हा सगळ्या दुनियेत पुढारलेला देश मनाला जातो. पण या देशातील काही राज्यातील कायदे अगदी विचित्र म्हणावे असे आहेत. केवळ अमेरिकाच नाही तर प्रगत आणि शिस्तीचा देश अशी ओळख असलेला सिंगापूर आणि इस्त्रायलनेही असे विचित्र नियम कायदे त्यांच्या देशात लागू केलेले आहेत.


अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन मध्ये लॉलीपॉप खाण्यावर बंदी आहे असे सांगतात. अनेकांच्या मते अशी बंदी नाही आणि काडीला लावलेली गोळी किंवा चॉकलेट येथे विकले जाते आणि विकत घेता येते. कॅलिफोर्निया मध्ये टबमध्ये बसून संत्रे खाणे निषिद्ध असून न्यूजर्सी मध्ये बुलेटप्रुफ जॅकेट घालून खून करणे बेकायदा आहे. टेक्सास मध्ये रिकामी बंदूक दाखवून धमकावणे गुन्हा मनाला जातो.व्हेरमोंट येथे महिलेला दाताची कवळी बसवून घ्यायची असेल किंवा नकली दात बसवायचे असतील तर नवऱ्याची रीतसर परवानगी घ्यावी लागते.


अर्केंसास राज्यात नवरा बायकोला आठवड्यातून एकदाच चोप देऊ शकतो. आठवड्यात दुसऱ्यांदा बायकोला बदडून काढणे हा गुन्हा आहे. जॉर्जिया मध्ये शाळेतील मुलगा आणि मुलगी एकत्र फिरत असतील तर मुलीच्या हातातील पुस्तके मुलाने धरावी लागतात अन्यथा तो गुन्हा मनाला जातो. बोस्टन शहरात एकावेळी एका घरात तीन कुत्री पाळणे बेकायदा आहे.


न्यूयॉर्क शहरात चिमटे लावून कपडे वाळत घालायचे असतील तर तसा परवाना घ्यावा लागतो. हवाई मध्ये जुळे भाऊ एकाच कंपनीत काम करू शकत नाहीत. मियामी मध्ये प्राण्याची नक्कल करणे गुन्हा आहे तर लॉस एंजेलिसमध्ये एकाच टब मध्ये दोन मुलांना अंघोळ घालणे बेकायदा आहे. सान फ्रान्सिस्को मध्ये अंडरवेअरने कार साफ करणे बेकायदा मानले जाते तर केंटुकी मध्ये खिशातून आईसक्रीम नेता येत नाही.


युरेका नेवाडा मध्ये मिशीवाले मर्द महिलेला कीस करू शकत नाहीत, तो गुन्हा आहे. न्यूयॉर्क मध्ये छतावरून उडी मारली तर फाशीची शिक्षा होऊ शकते. इस्त्रायल मध्ये रविवारी नाक शिंकरणे कायद्याविरोधात आहे तर स्वीडन मध्ये २४ तास, १२ महिने वाहनाचे हेड लाईट ऑन ठेवणे बंधनकारक आहे.


ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया शहरात घरातील गेलेला बल्ब आपण बदलू शकत नाही तर त्यासाठी इलेक्ट्रिशियन ला बोलवावे लागते. सिंगापूर मध्ये च्युईंगम खाल्ल्यास भक्कम दंड भरावा लागतो. चीन मध्ये फुल, रुमाल आणि घड्याळ भेट देणे निषिद्ध आहे तर थायलंड मध्ये पैश्यावर पाय देणे बेकायदा मानले जाते.

Leave a Comment