दोन डोसमधील अंतर ब्रिटनने केले कमी, आठ आठवड्यात मिळणार कोरोनाचा दुसरा डोस


लंडन : ब्रिटनने कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता लसीकरणाचा वेग आता वाढवला आहे. त्यासाठी ब्रिटनने कोरोनाच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ 50 वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी हा नियम लागू असल्याचे ब्रिटनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. आधी दोन डोसमधील अंतर हे ब्रिटनमध्ये 12 आठवड्यांचे होते. ते आता कमी करण्यात येऊन 8 आठवडे एवढे करण्यात आले आहे.

याबाबत माहिती देताना ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितले की, कोरोनापासून 50 वर्षावरील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी लवकर दुसरा डोस देण्यात येईल. भारतातील कोरोना म्युटंटमुळे ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे त्यावर पंतप्रधानांनी चिंताही व्यक्त केली आहे. भारताने कोरोनाच्या दोन डोसमधील अंतर वाढवलेला असताना ब्रिटनने मात्र दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.