ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसतील 2000 रुपये त्यांनी येथे संपर्क करा आणि अशी नोंदवा तक्रार


नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल आणि मोदी सरकारने या योजनेअंतर्गत पाठवलेला हप्ता अद्याप तुम्हाला मिळाला नसेल तरी ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मोदी सरकारने काल म्हणजेच 14 मे रोजी या योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला आहे. ही रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तांतरित केली.

2000 रुपये या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्या शेतकऱ्यांपैकी तुम्ही देखील असाल आणि तुम्हाला अद्याप मदत मिळालेली नाही, तर तुम्हाला चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. काही हेल्पलाइन क्रमांक सरकारने जारी केले आहेत त्यावर संपर्क करून तुम्ही तक्रार दाखल करून शकता. त्याचबरोबर तुम्ही लेखापाल किंवा कृषी विभागाच्या संपर्क करू शकता.

सरकारकडून अनेकदा पैसे पाठवले जातात, पण काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पोहोचत नाहीत. यामध्ये काही तांत्रिक कारणे देखील असतात. पण अनेकदा शेतकऱ्यांनी प्रविष्ट केलेला आधार क्रमांक आणि खाते क्रमांक यामध्ये गोंधळ असल्यास ते पैसे लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत.

तुम्ही या योजनेसंदर्भात तक्रार करण्यासाठी लेखापाल किंवा कृषी विभागाच्या संपर्क करू शकता आणि त्यांना सविस्तर माहिती देऊ शकता. तिथे तुमचे काम न झाल्यास या योजनेकरिता सरकारने काही हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत त्यावर संपर्क करून तुम्ही तक्रार करू शकता.

तुम्ही पीएम शेतकरी सन्मान टोल फ्री नंबर असणाऱ्या हेल्पलाइन नंबर 011-24300606 / 011-23381092 यावर संपर्क करू शकता. याशिवाय सोमवार ते शुक्रवारपर्यंत पीएम-किसान हेल्प डेस्क (PM-KISAN Help Desk) चा ई-मेल (Email) pmkisan-ict@gov.in यावर देखील संपर्क करू शकता.