पिकासोच्या पेंटिंगने पुन्हा लिलावात नोंदविले रेकॉर्ड

पाब्लो पिकासो हे कलाक्षेत्रातील एक अतिशय प्रसिध्द नाव. पिकासोची चित्रे किंवा पेंटिंग हा चित्रकला क्षेत्रात नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. पिकासो याचे एक पेंटिंग नुकतेच लिलावात विकण्यात आले आणि त्या पेंटिंगने नवे रेकॉर्ड नोंदविले. केवळ १९ मिनिटात या पेंटिंगची विक्री झाली तीही १०३.४ दश लक्ष डॉलर्सला. कमी वेळात विक्रमी किंमत मिळविण्याचे रेकॉर्ड या पेंटिंग ने केले.

पिकासोची पेंटिंग लिलावात नेहमीच करोडोच्या किमतीला विकली जातात. अमेरिकेत न्युयॉर्क येथे ‘ मेरी थ्रीज’ नावाच्या या प्रसिद्ध पेंटिंगचा लिलाव केला गेला. हे पेंटिंग पिकासोने १९३२ मध्ये बनविले होते. ९० वर्षानंतर जेव्हा हे पेंटिंग प्रेक्षकांच्या समोर आले तेव्हाच त्याने जागतिक रेकॉर्ड नोंदविले होते. या पेंटिंग ला ९० दशलक्ष डॉलर्स किंमत मिळाली पण अन्य कर व चार्जेस धरून त्याची किंमत १०३.४ दशलक्ष डॉलर्स झाली.

या पेंटिंग मध्ये एक मुलगी खिडकीजवळ बसलेली दिसते. आठ वर्षापूर्वी हेच पेंटिंग लंडन येथे झालेल्या लिलावात ४४.८ दशलक्ष डॉलर्सला विकले गेले होते. त्याला आता दुपटीपेक्षा अधिक किंमत मिळाली आहे. पिकासोची पाच पेंटिंग आत्ता पर्यंत १०० दशलक्ष डॉलर्स पेक्षा अधिक किमतीला विकली गेली आहेत. गेल्या दोन वर्षात १०० दशलक्ष डॉलर्स पेक्षा जास्त किमतीला विकले गेलेले हे पिकासोचे दुसरे पेंटिंग आहे.