चीनचे जुरोंग रोव्हर मंगळावर उतरले

चीनच्या जुरोंग रोव्हरने सात महिन्याचा अंतराळ प्रवास, तीन महिने मंगळ ग्रहाच्या कक्षेत भ्रमण केल्यावर शेवटची सात कठीण मिनिटे यशस्वी पार करून मंगळाच्या पृष्ठभागावर अखेर पाय टेकले आहेत. शनिवारी सकाळी हे रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वी रित्या उतरल्याचे चायना नॅशनल स्पेस अॅडमिनीस्ट्रेशन (सीएनएसए) जाहीर केले आहे.

सीएनएसएच्या म्हणण्यानुसार चीनचे  मंगळ ग्रहावर उतरलेले जुरोंग हे पहिले रोव्हर आहे. तियानमेन १ने १० फेब्रुवारी रोजी मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला होता. मंगळासंबंधी महत्वपूर्ण माहिती यामुळे मिळू शकलीच पण आता जुरोंग मंगळ पृष्ठभागावर उतरल्याने तेथील बर्फ, जमीन यांची अधिक माहिती मिळू शकणार आहे. या रोव्हरचे नाव देवावरून ठेवले गेले आहे. जुरोंग हे चीनी अग्नीदेवतेचे नाव आहे. मंगळ सुद्धा अग्नी ग्रह मानला जातो. तियानचेनच्या पोटात हे रोव्हर होते. तियानचेन सतत रोव्हर आणि लँडर साठी मॅपिंग करत होते.

भारताने २०१४ मध्ये सोडलेले मंगळयान मंगळ कक्षेत आजही स्थिर असून मंगळाची महिती आजही इस्रो कडे पाठवित आहे.