परेश रावल यांच्या निधनाची अफवा, रावल यांनीच केली पोस्ट शेअर

करोनाचा दणका बॉलीवूड उद्योगाला सुद्धा बसला आहे आणि अनेक सेलेब्रिटीच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर आल्या आहेत. त्यात आता अभिनेते परेश रावल यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली आहे. त्याला उत्तर म्हणून परेश रावल यांनी स्वतःच त्यांना श्रद्धांजली दिलेली पोस्ट शेअर केली आहे. इतकेच नव्हे तर अफवा अगदी लाईटली घेऊन त्याला मजेदार उत्तर सुद्धा दिले आहे.

रावल यांनी शेअर केलेल्या पोस्ट मध्ये त्यांचा फ्रेम मधला एक फोटो दिसतो आहे. त्या खाली आज १४ मे २१ रोजी सकाळी ७ वा. फिल्म जगतातील नामवंत अभिनेते परेश रावल यांचे निधन झाल्याचे लिहिले गेले असून दिवे आणि मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली दिली गेली आहे. परेश रावल आता आपल्यात नाहीत हे दुःखाने सांगावे लागते आहे असाही मजकूर यात आहे.

परेश रावल यांनी ही पोस्ट शेअर करून सकाळी सात नंतर मी झोपलो होतो असा खुलासा केला आहे. रावल सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात आणि त्याच्या ट्विटसचे फॉलोअर्स मोठ्या संखेने आहेत. देशातील ताज्या मुद्द्यांवर ते फॉलोअर्सशी मोकळेपणाने चर्चा करतात. चित्रपटाच्या बाबतीत बोलायचे तर फरहान अख्तरच्या तुफान मध्ये ते बॉक्सिंग कोच च्या भूमिकेत दिसणार आहेत.

सोशल मीडियावर या पूर्वी मीनाक्षी शेषाद्री, मुकेश खन्ना यांचे करोनाने निधन झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या आणि त्यांना ते जिवंत असल्याचा खुलासा तातडीने करावा लागला होता.