आजपासून देशात सुरु झाली स्पुटनिक-V ची डिलीवरी सुरू: एवढ्या किंमतीला मिळणार रशियन व्हॅक्सीनचा एक डोस


नवी दिल्ली – भारताला कोरोना विरोधातील लढाईमध्ये अजून एक कोरोना प्रतिबंधक लस मिळाली असून रशियन कोरोना प्रतिबंधक लस स्पुटनिक-V ची आजपासून डॉ. रेड्डीज लॅबोरेट्रीजने देशात डिलीवरी सुरू केली आहे. या लसी पायलट प्रोजेक्ट अंतर्गत मर्यादित कालावधीसाठी सध्या पुरवण्यात येत आहे. स्पुटनिक-V च्या लसीची किंमत डॉ. रेड्डीजने 995.40 रुपये ठेवली आहे.

डॉ. रेड्डीज म्हणाले की, सध्या प्रती डोस 948 रुपये दराने ते लस आयात करत आहेत. यावर 5% दराने जीएसटी आकारला जात आहे. यानंतर, लसची किंमत प्रति डोस 995.4 रुपये होते. स्पुटनिक-व्हीचा पहिला डोस शुक्रवारी हैदराबादच्या डॉ. रेड्डीज प्रयोगशाळेमध्ये कस्टम फार्मा सर्व्हिसेसचे ग्लोबल हेड दीपक सप्रा यांना देण्यात आला. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे (RDIF) भारतीय भागीदार आहेत. रशियन लस स्पुटनिक-V फक्त डॉ. रेड्डीजच्या प्रयोगशाळांमध्ये तयार केली जाईल.

डॉ. रेड्डीज म्हणतात की स्पुटनिक-V ची पहिली खेप 1 मे रोजी भारतात पोहोचली. या खेपेला 13 मे रोजी केंद्रीय औषध प्रयोगशाळा कसौलीकडून नियामक मंजुरी मिळाली. येत्या काही महिन्यांत लसीच्या आणखी काही खेप येणे अपेक्षित आहे. यानंतर भारतात स्पुटनिक-V ची निर्मिती होईल. भारतात तयार केलेल्या लसीची किंमत कमी केली जाऊ शकते.

डॉ. रेड्डीज म्हणतात की, आमची कंपनी देशातील लसींच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी 6 उत्पादकांसोबत चर्चा करत आहेत. त्याचबरोबर कंपनी जास्तीत जास्त लोकांच्या लसीकरणासाठी सरकार आणि प्रायव्हेट सेक्टरसोबत काम करत आहे. डॉ. रेड्डीचे को-चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर जीव्ही प्रसाद म्हणतात की, देशात कोरोनाबाधितांची संख्या सलग वाढत आहे. अशा वेळी कोरोना विरोधातील लढ्यात लसीकरण सर्वात जास्त प्रभावी हत्यार आहे. भारतीयांचे लसीकरण योग्य वेळी होणे ही आपली प्राथमिकता आहे.

स्पुटनिक V ला आतापर्यंत जगातील 60 देशांमध्ये मंजुरी मिळाली आहे. सर्वात पहिले ऑगस्ट 2020 मध्ये रशियाने याला मंजूरी दिली होती. यानंतर बेलारूस, सर्बिया, अर्जेंटीना, बोलिविया, अल्जीरिया, फिलिस्तीन, वेनेजुएला, पॅराग्वे, यूएई, तुर्कमेनिस्तानमध्येही मंजुरी देण्यात आली. यूरोपीय यूनियनचे ड्रग रेग्युलेटरहीकडूनही याला लवकरच मंजुरी मिळू शकते.