क्रिकेटपटू वृद्धिमान साहा अद्यापही कोरोना पॉझिटिव्ह


नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा अद्यापही कोरोना पॉझिटिव्ह आहे. साहाला आयपीएल २०२१ दरम्यान कोरोनाची लागण झाली. सुमारे दोन आठवडे क्वारंटाइन राहिल्यानंतरही त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनाची कोणतीही लक्षणे वृद्धिमान साहामध्ये आढळून आलेली नाहीत. यापूर्वी साहा या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, की तो जवळजवळ बरा झाला आहे. पण, आता पुन्हा पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याला दिल्लीत क्वारंटाइन राहावे लागेल. त्यांची पुन्हा एकदा चाचणी केली जाईल. या चाचणीत निगेटिव्ह आढळल्यास डॉक्टर त्याला क्वारंटाइनमधून मुक्त करू शकतात.

मला जेव्हा कोरोना झाल्याचे कळाले त्यानंतर मी घाबरलो होतो. पृथ्वीवर थांबलेल्या कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर, मला भीती वाटली. कुटुंबातील प्रत्येकजण खूप काळजीत होता. आम्ही त्यांना व्हिडीओ कॉलद्वारे धीर दिला, की घाबण्याचे कारण नाही. माझी पुरेशी काळजी घेतली जात असल्याचे साहाने सांगितले होते.

वृद्धिमान साहाचा इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या वीस सदस्यांमध्ये संघात समावेश करण्यात आला आहे. तो पूर्णपणे बरा झाल्यानंतर तो संघासह जाऊ शकेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याव्यतिरिक्त भारताला इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिकादेखील खेळायची आहे.