मिक्स्ड मार्शल आर्ट फायटर कोनोर बनला सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू

प्रसिद्ध मिक्स्ड मार्शल आर्ट फायटर कोनोर मॅकग्रेगर जगातील सर्वाधिक कमाई करणारा अॅथलेट बनला आहे. फोर्ब्स मासिकाने २०२० मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या दहा खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्यात आयरलंडच्या या ३२ वर्षीय फायटरने पहिला क्रमांक मिळविला आहे. त्याने एक वर्षात १३२४ कोटी म्हणजे १८० मिलियन डॉलर्स कमाई केली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षात त्याने फक्त एक मुकाबला खेळला असून त्यातील विजयाबद्दल त्याला २२ दशलक्ष डॉलर्स म्हणजे १६२ कोटी रुपये इनाम मिळाले आणि बाकीची ११२६ कोटी म्हणजे १५८ दशलक्ष डॉलर्सची रक्कम त्याने मैदानाबाहेरील अन्य स्त्रोतातून मिळविली आहे.

मैदानाबाहेर अन्य स्त्रोतातून कमाई करणाऱ्यात रोजर फेडरर, टायगर वूड्स नंतर कोनोर तिसरा खेळाडू आहे. त्यांनी मैदानाबाहेर एका वर्षात ५१५ कोटी किंवा ७० दशलक्ष डॉलर्स पेक्षा अधिक कमाई केली आहे. कोनोर बरोबर गतवर्षी १०० दशलक्ष डॉलर्स किंवा ७३५ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करणारे अन्य चार खेळाडू असे आहेत. लियोनेल मेस्सी फुटबॉल- ९५६ कोटी, रोनाल्डो फुटबॉल- ८८२ कोटी, डाक प्रेस्कॉट सॉकर लीग- ७९० कोटी. लेब्रोन जेम्स बास्केटबॉल- ७०९ कोटी, नेमार फुटबॉल- ६९८ कोटी. लुईस हेमिल्टन फॉर्मुला रेस- ६०३ कोटी, टॉन ब्रँडी सॉसर- ५५९ कोटी आणि केविन डूरंट बास्केटबॉल ५५१ कोटी.

गतवर्षी या यादीत आघाडीवर असलेला टेनिस स्टार रॉजर फेडरर या यादीत सातव्या स्थानावर घसरला आहे.