स्वदेशी ‘कु’ च्या नव्या लोगोचे श्री श्री रविशंकर यांनी केले उद्घाटन

देशी मायक्रोब्लॉगिंग साईट ‘कु’ ने नवा लोगो लाँच केला असून त्याचे उद्घाटन आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक आर आर रविशंकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. रविशंकर यांच्या ६५ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम पार पाडला गेला. स्वदेशी कु अनेक भारतीय भाषांत उपलब्ध असून १ मार्च २०२० या दिवशी ही साईट लाँच झाली आहे. सध्या कु चे ६० लाख युजर्स आहेत.

यावेळी बोलताना श्री श्री रविशंकर म्हणाले, सामाजिक संपर्क व माहितीचा प्रवाह हा सभ्य समाजाचा संकेत आहे. देश विदेशातील लाखो लोकांना ही साईट जोडते आहे. कमी वेळात एक चांगली साईट बनविल्याबद्दल कु टीमचे अभिनंदन.

कु चे सहसंस्थापक अप्रमेय राधाकृष्ण म्हणाले आमची नवी ओळख सर्वांसमोर आणली आहे. ही छोटीशी पिवळी चिमणी बाल्यावस्थेतून किशोरावस्थेत गेली अआच पण ती सकारत्मकतेने परिपूर्ण आहे. लोकांच्या आयुष्यातील विविध पैलू, सकारात्मक वार्ता आणि चर्चा यांना ती प्रेरणा देईल असा विश्वास आहे. हा छोटा पक्षी आता उडण्यासाठी तयार आहे. कु ने नुकतेच टॉक टू टाईप फिचर लाँच केले असून त्यामुळे युजर त्याच्या बोलीभाषेत फक्त बोलून टाईप करू शकणार आहे.