स्ट्रॉम आर ३- स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक कार लाँच

भारतात इलेक्ट्रिक कार्सची मागणी वाढत असली तरी सध्या या कार्सच्या किमती सर्वसामान्य ग्राहकाला परवडतील अश्या नाहीत. या कार्स किमान १० लाख रुपये रेंज मध्ये उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई बेस्ड स्टार्टअप ने केवळ साडेचार लाख रुपये किमतीत एका आकर्षक इलेक्टिक कार स्ट्रॉम आर ३ नावाने लाँच केली आहे. देशातील ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. एका सिंगल चार्ज मध्ये ती २०० किमी अंतर कापेल असा कंपनीचा दावा आहे.

या कार मध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर केला गेला असून एक लाख किमी किंवा ३ वर्षांची वॉरंटी त्यावर दिली गेली आहे. ही तीन चाकी कार आहे. दोन दरवाजे दिले गेले आहेत आणि १० हजार रुपये भरून कारचे बुकिंग करता येणार आहे. कारचे डिझाईन थोडे हटके आहे. पुढच्या बाजूला दोन चाके आणि मागे एक चाक आहे. चार रंगात ही कार उपलब्ध आहे. कारचा टॉप स्पीड ताशी ८० किमी असून तीन तासात फास्ट चार्जिंग वर ही कार चार्ज होते. इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स असे तीन ड्रायविंग मोडस आहेत. या कार मधून दोन प्रौढ व्यक्ती सामानसह आरामात प्रवास करू शकणार आहेत. सिंगल बेंच सीट ऑप्शन घेतला तर तीन व्यक्ती प्रवास करू शकतात.

शहरी भागात, वाहतूक कोंडीत आणि पार्किंग साठी कमी जागा या परिस्थितीत ही कार वापरास आदर्श असल्याचा कंपनीचा दावा आहे.