किंग खानची चाहत्यांसाठी हटके ईदी

आज मुस्लीम समाजाचा पवित्र सण ईद साजरा होत आहे. या दिवशी नमाजानंतर मित्र नातेवाईक यांच्या सोबत मेजवानीचा आस्वाद घेतला जातो आणि एकमेकांना भेटवस्तू, पैसे दिले जातात. याला ईदी असे म्हटले जाते. सध्या करोना काळामुळे नागरिकांच्या एकत्र येण्यावर बंधने आहेत. बॉलीवूड स्टार आणि किंग खान अशी ओळख असलेल्या शाहरुखने ईद निमित्त त्यांच्या चाहत्यांना हटके ईदी दिली आहे.

देश विदेशात आपल्या खास स्टाईलमुळे लोकप्रिय असलेल्या किंग खानचे काही खास फोटो काही वेळापूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केले गेले आहेत. एसआरकेच्या चाहत्यांना हे फोटो म्हणजे सरप्राईज ईदी आहे. या फोटोतून सणाचा मूड अगदी स्पष्ट प्रतीत झाला आहे. बॉलीवूडचा टॉप फोटोग्राफर डब्बू रतनानी याने हे फोटो शूट केले आहेत.

मरून आणि ब्लॅक पठाणी सुट मध्ये यात किंग खानचे रॉयल दर्शन घडते आहे. ब्लॅक शेरवानीने फेस्टीव्ह लुक अधिक आकर्षक बनला आहे. एका लाकडी खुर्चीत आरामात बसून किंग खानने फोटो साठी पोझ दिली आहे. यापूर्वीही डब्बूने किंग खानचे काही फोटो शेअर केले होते आणि त्यामुळेच डब्बू चर्चेत आला होता.