जगातील सेक्सीएस्ट अॅथलिट टोक्यो ऑलिम्पिकची करतेय तयारी

जर्मन अॅथलिट अलिसा स्मिट हिची ओळख जगातील सर्वात सुंदर आणि सेक्सी अॅथलिट पैकी एक अशी आहे. तिचे फोटो इंटरनेटवर सतत शेअर होतात. २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियातील मासिकाकडून अलिसाला जगातील सर्वात सेक्सी अॅथलिट हा खिताब दिला गेला आहे. त्यानंतर तिची लोकप्रियता वेगाने वाढली आहे. २२ वर्षाची ही सौंदर्यवती सध्या टोक्यो ऑलिम्पिक साठी सराव करण्यात मग्न आहे. जर्मनीची फ्युचर स्टार म्हणून अलिसा कडे पाहिले जाते.

अलिसाने तिच्या करियरची सुरवात ज्युनिअर लेव्हल पासून केली. २०१७ मध्ये अंडर २० युरोपियन अॅथलिट चँपियनशिप मध्ये तिने ४ बाय ४०० रिले आणि ४०० मीटर इव्हेंट मध्ये रजत पदकाची कमाई केली होती. अलिसा इन्स्टाग्रामवर विशेष अॅक्टीव्ह असून तिचे १६ लाख फॉलोअर्स आहेत. ती तिच्या चाहत्यांसाठी ट्रॅकवरचे तसेच व्हेकेशनचे फोटो नेहमीच शेअर करते. जर्मनीच्या वॉर्म्स येथे १९९८ मध्ये जन्मलेल्या अलिसाने ७ व्या वर्षी स्पर्धेत सहभगी होण्याची सुरवात केली असून हायस्कूल नंतर तिने अॅथलिट मध्येच करियर करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय टीम मध्ये सहभागी होण्यासाठी ती बर्लिन येथे आली आणि एसीसी स्पोर्ट्स क्लब मध्ये तिचे प्रशिक्षण सुरु झाले असे समजते.