देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांची आकडेवारी वाढली


नवी दिल्ली – देशात कोरोनाचे थैमान अद्यापही कायम आहे. त्यातच दररोज कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा नवनवे उच्चांक गाठताना दिसत आहे. दीड लाखांहून अधिक लोकांचा कोरोनाने आतापर्यंत जीव घेतला आहे.

आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 348,421 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे 4205 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 3,55,338 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एका दिवसात झालेल्या मृत्यूंच्या नोंदींपैकी ही सर्वाधिक नोंद आहे. यापूर्वी 7 मे रोजी 4187 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता.

देशभरात 11 मेपर्यंत 17 कोटी 52 लाख 35 हजार 991 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. काल दिवसभरात 24 लाख 46 हजार 674 लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर आतापर्यंत जवळपास 30.75 कोटी टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 19.83 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्ह रेट 17 टक्क्यांहून अधिक आहे.

देशात कोरोना मृत्यूदर 1.09 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 83 टक्क्यांहून कमी आहे. सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन 16 टक्क्यांहून अधिक झाला आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत देशभरात दुसऱ्या स्थानी आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येतही भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझील, मेक्सिकोनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाला आहे.

कोरोनाबाधितांचा महाराष्ट्रातील आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. राज्यात काल 71 हजार 966 कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज नवीन 40 हजार 956 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. कालही राज्यात 37 हजार 326 रुग्णांची नोंद झाली होती. राज्यात आजपर्यंत एकूण 45,41,391 कोरोनाबाधित बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.67 टक्के झाला आहे. तर आज राज्यात 793 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.49 टक्के एवढा आहे.