गतवर्षीच्या करोना मृतांची प्रेते अजूनही दफन होण्याच्या प्रतीक्षेत

अमेरिकेत गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा करोनाचा प्रभाव कमी असला तरी गेल्या वर्षाच्या काही खुणा आजही न्युयॉर्क शहरात अजूनही शिल्लक आहेत. करोनाचे बळी ठरलेल्या सुमारे ७५० मृतांची प्रेते रेफ्रीजरेटेड ट्रक मध्ये आजही दफन होण्याचा प्रतीक्षेत आहेत. गेल्या वर्षी तात्पुरती दफनभूमी म्हणून या ट्रकचा वापर केला गेला होता मात्र अजूनही या प्रेतांचे दफन झालेले नाही.

न्युयॉर्क शहराच्या वैद्यकीय परीक्षण कार्यालयाने या संदर्भात शुक्रवारी एक पत्रक जारी केले आहे. त्यानुसार ब्रुकलीन किनारी ट्रक मधून अजून ७५० प्रेते आहेत. जो पर्यंत त्यांचे कुटुंबीय त्यांच्या दफनाची सोय करत नाहीत तो पर्यंत ती याच स्थितीत ठेवली जाणार आहेत. शहराबाहेर शेतात त्यांचे दफन करणे शक्य असल्याचे सांगितले जात आहे. मात्र गेल्या वर्षी दफन सल्ला कमिटीने शहराबाहेर दफन करण्यास मान्यता दिली नव्हती. एका वेबसाईटवर गेल्या आठवड्यात या रेफ्रीजरेटेड ट्रक मध्ये ५०० ते ७०० शव असल्याचा दावा केला गेला होता.