कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, प्रेमळ मातेचे दर्शन घडविणारा व्हिडीओ व्हायरल

इन्स्टाग्रामवर प्रसिद्धी मिळविण्यासाठी अनेक जण अनेक प्रकारे प्रयत्न करत असतात. मात्र जातीच्या सुंदरला काहीही शोभते या म्हणीप्रमाणे कुणा कुणाला असल्या प्रसिद्धीसाठी विशेष काहीच करावे लागत नाही कारण त्यांचे वागणे, बोलणे आणि सहज वावर त्यांना प्रसिद्धी मिळवून देतो. इन्स्टाग्रामवर व्हायरल व्हिडीओ आणि फोटो मध्ये सध्या एका नव्या व्हिडीओची विशेष चर्चा आहे.

महाराष्ट्र पोलीस दलात सबइन्स्पेक्टर म्हणून कर्तव्य पार पाडत असलेल्या औरंगाबादच्या रहिवासी अनिता फसाटे यांचा मातृदिनाच्या निमित्ताने आलेला व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर अनिता यांचे हजारो फॉलोअर आहेत. कर्तव्य पार पाडण्यात सदैव तत्पर असलेल्या या लेडी सिंघमचा हा व्हिडीओ पोलीस वर्दी किंवा पॉलिसी खाक्या साठी नाही तर कुटुंबावरील प्रेमामुळे वेगाने लोकप्रिय बनला आहे.

अनिता ड्युटीवर असताना पडेल ते काम चोख पार पाडतात याचा अंदाज त्यांच्या पोस्ट आणि कॅप्शन वाचून येतो. अनेकदा त्यांचे स्टायलिश फोटोही शेअर केले जातात. पण नुकत्याच आलेल्या त्यांच्या व्हिडीओ मध्ये त्यांच्या मुलीला त्यांची असलेली ओढ आकर्षणाचा विषय ठरली आहे. पोलीस ड्युटी बजावून घरी आल्यावर त्याची ही चिमुरडी मुलगी त्यांच्या मागे धावताना यात दिसत आहे. या व्हिडीओ ला २ लाख ६५ हजार लाईक मिळाले असून ४४ लाख व्युज मिळाले आहेत.