पुणे : मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल


पुणे – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल पुण्यातील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याबद्दल विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे राजेंद्र काकडे (वय-५२, रा. वडगाव शिंदे हवेली) असे नाव आहे.

याबाबत विमानतळ पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शिंदे येथील राजेंद्र शिंदे हा रहिवासी आहे. ७ मे रोजी सायंकाळच्या सुमारास या आरोपीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर, या प्रकरणी लोहगाव येथील आनंद गोयल यांनी फिर्याद दिली. त्यानुसार या प्रकरणी एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असलेले राजेंद्र पंढरीनाथ काकडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.