विराट कोहलीने घेतला करोना लसीचा पहिला डोस

टीम इंडियाचा कप्तान ३२ वर्षीय विराट कोहली याने करोना लसीचा पहिला डोस घेतला असून त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. विराट इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोच्या बरोबर लिहितो, ‘सोमवारी कोविड १९ लस घेतली. जेवढ्या लवकर तुम्हाला ही लस घेता येईल तेवढया लवकर लस घ्या आणि स्वतःला सुरक्षित ठेवा.’

विराट आणि अनुष्का यांनी कोविड संकट सहाय्यता मदतीसाठी यापूर्वीच एक धनसंचय कार्यक्रम क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्म केटो सह सुरु केला असून सुरवातीला स्वतःचे कॉन्ट्रीब्युशन म्हणून २ कोटी रुपये दिले होते. अन्य दात्यांना सुद्धा त्यांनी दान करण्याचे आवाहन केल्यावर एका दिवसात त्याला प्रतिसाद म्हणून दीड कोटीची रक्कम जमा झाली असल्याचे विराटने सांगितले आहे.

विराट आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर्सचे नेतृत्व करत असून बायोबबल मधील खेळाडूंना करोना संसर्ग झाल्याचे प्रकार समोर आल्यावर आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे विराट घरी पोहोचला आहे.