मस्क यांच्या मिशन मूनचे पेमेंट डॉगइ कॉइन मध्ये स्वीकारले जाणार

एलोन मस्क यांनी स्पेस एक्स २०२२ च्या पहिल्या तिमाहीत ‘डॉगइ -१, मिशन टू मून’ लाँच करत असल्याची घोषणा केली असून कमर्शिअल रॉकेट कंपनी क्रिप्टोकरन्सी डॉगइ कॉइन स्वरुपात त्यासाठी पेमेंट स्वीकारणार असल्याचे सांगितले आहे.

स्पेस एक्स ही एरोस्पेस कंपनी मस्क यांनी २००२ मध्ये स्थापन केली असून सोशल मीडियावर पुढच्या वर्षात मिशन टू मून लाँच होत असल्याचा एक व्हिडीओ शेअर केला गेला आहे. मस्क यांनी शनिवारी एका लाईव्ह कार्यक्रमात मिशन टू मून साठी डॉगई कॉइन पेमेंट स्वीकारले जाईल असे सांगितले होते. बीटकॉइन, ईथीरीयम, बायनेन्स प्रमाणे डॉगइकॉइन ही सुद्धा एक क्रिप्टोकरन्सी आहे. आयबीएम मधील दोन सोफ्टवेअर इंजिनीयर्सने २०१३ मध्ये ही करन्सी लाँच केली होती.

आज जगातील ती चार नंबरची मोठी क्रिप्टोकरन्सी असून तिची किंमत वाढण्यास मस्क यांचा मोठा हातभर लागला असल्याचे सांगितले जाते. सुरवातीला या करन्सी कडे जोक म्हणून पाहिले गेले होते. याचे कारण म्हणजे तिचा लोगो शिबा ईनु हा रेडीफवर लोकप्रिय असलेला कुत्रा आहे. पण मस्क यांच्याकडून पाठींबा मिळाल्यावर तिच्या व्हॅल्यु मध्ये २० हजार पटीने वाढ झाल्याचे सांगितले जाते.

मस्क यांनी टेस्ला मार्फत १.५ अब्ज डॉलर्सचे बीटकॉइन खरेदी केले होते. त्यानंतर बीटकॉइनची सुद्धा विक्रमी वाढ झाली होती. मस्क यांनी त्यावेळी १० टक्के बीटकॉइन विकून त्यातून १०१ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली होती.