अमेरिकेवर सायबर हल्ला, आणीबाणी जाहीर

सायबर हल्ला झाला म्हणून एखाद्या देशाने आणीबाणी जाहीर केल्याची बातमी आजपर्यंत ऐकिवात नव्हती. पण आता अमेरिकेने सायबर हल्ला झाला म्हणून देशात आणीबाणी जाहीर केली आहे. देशावरील हा सर्वात मोठा सायबर हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. हँकर्सनी कोलोनीयल पाईपलाईन या इंधन वाहून नेण्याचे काम करणाऱ्या कंपनीवर सायबर हल्ला केला असून त्यामुळे ईस्ट कोस्ट राज्यात डिझेल, जेट इंधन आणि पेट्रोल पुरवठा विस्कळीत झाला आहे. ही कंपनी दररोज २५ लाख बॅरल इंधन या राज्यांना पुरविते. हे प्रमाण एकूण पुरवठ्याच्या ४५ टक्के आहे.

शुक्रवारी हा हल्ला झाल्याचे समजते. याचे मुख्य कारण म्हणजे करोना मुळे या कंपनीतील बहुतेक सर्व इंजिनिअर्स वर्क फ्रॉम होम करत आहेत. रेन्समवेअर नुसार डार्क साईड नावाच्या एका गुन्हेगारी टोळीने हा सायबर हल्ला केला आहे. त्यांनी गुरुवारीच कलोनीयल नेटवर्क मध्ये सेंध करून १०० जीबी डेटा चोरला आहे. हॅकर्सनी काही संगणक आणि सर्व्हर डेटा लॉक केला असून शुक्रवारी खंडणीची मागणी केली आहे. अन्यथा हा डेटा इंटरनेटवर लिक करण्याची धमकी दिली आहे.

कंपनीच्या चार मुख्य लाईन्स या हल्ल्यामुळे बंद पडल्या असून रस्ते मार्गाने इंधन पुरवठा सुरु केला गेला असल्याचे समजते. यामुळे संबंधित राज्यात डिझेल पेटोलचे दर वाढले असल्याचेही सांगितले जात आहे.