आज पार पडणार ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी


कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा सत्ता काबीज केल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. ज्यानिमित्ताने मंत्रीपदी 43 नव्या चेहऱ्यांची वर्णी लागणार आहे. या मंत्रिमंडळात अनेक नवोदितांना स्थान दिले जाणार असल्याचा अंदाज अनेकांनीच वर्तवला आहे. ज्यामुळे काही जुन्या मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल होऊ शकतात. प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. अमित मित्र आणि ब्रात्य बसू दूरदृश्य प्रणालीद्वारे शपथ घेणार आहेत.

संभाव्य कॅबिनेट मंत्र्यांच्या यादीत अमित मित्रा, पार्थ चटर्जी, सुब्रत मुखर्जी, साधन पांडे, ज्योतिप्रिय मल्लिक, ब्रात्य बसू, बंकिम चंद्र हाजरा, अरूप विश्वास, मलय घटक, डॉ. मानस भुइयां, सोमेन महापात्र, उज्ज्वल विश्वास, अरूप राय, फिरहाद हकीम, रथीन घोष, डॉ शशि पांजा, चंद्रनाथ सिंह, शोभनदेव चटोपाध्याय, पुलक राय, गुलाम रब्बानी, विप्लव मित्र, जावेद खान, सपन देबनाथ आणि सिद्दिकुल्ला चौधरी यांच्या नावांचा समावेश आहे.

तर स्वतंत्र प्रभारी म्हणून बेचाराम मन्ना, सुब्रत साहा, हुमायूं कबीर, अखिल गिरी, चंद्रिमा भट्टाचार्य, रत्ना डे नाग, संध्यारानी टुडू, बुलू चिक बराई, सुजीत बोस आणि इंद्रनील सेन यांना स्वतंत्र प्रभारी (राज्य मंत्री) ची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. याशिवाय दिलीप मंडल, अखरूज्जमां, शिउली साहा, श्रीकांत महतो, जसमीन शबीना, वीरवाहा हांसदा, ज्योत्सना मंडी, मनोज तिवारी, परेशचंद्र अधिकारी यांची वर्णी लागू शकते.

तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 213 जागांवर यश मिळवले. तर, भाजपच्या खात्यात 77 जागा गेल्या. याच निकालाच्या धर्तीवर तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी 5 मे ला, तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सर्व सूत्र पुन्हा एकदा आपल्या हाती घेतली.