पहिलवान सुशीलकुमार साठी लुक आउट नोटीस जारी?

छत्रसाल स्टेडियमवर पहिलवानांच्या दोन गटात झालेल्या मारामारीत पहिलवान सागर धनकड यांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणात ऑलिम्पिक पदक विजेता पहिलवान सुशीलकुमार व त्याच्या साथीदारांचा अजूनही शोध लागलेला नाही. त्यांनी देश सोडून जाऊ नये म्हणून दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर लुक आउट नोटीस जारी करण्याची तयारी केली असल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना घडली त्या दिवशी सागरचे दोन साथीदार रविंद्र, भगतसिंग यांची जबानी नोंदविली गेली होती. त्यात सागरवर हल्ला करणाऱ्यात सुशीलचे नाव त्यांनी घेतले होते. यामुळे सुशीलच्या अडचणी वाढल्या होत्या. सुशील आणि त्यांच्या साथीदारांविरोधात कायदेशीर नोटीसा त्यांच्या घरी पोहोचविल्या गेल्या होत्या. एका फ्लॅट वरून झालेल्या या भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले होते. यात सागरचा मृत्यू झाला. सुशीलच्या एका साथीदाराला, प्रिन्स दलाल याला अटक करून पोलिसांनी त्याचा मोबाईल शिवाय पाच कार्सची तपासणी केळी. त्यातून येथे गोळीबार झाला नसल्याचे स्पष्ट झाले होते.

रविवारी पोलिसांनी दिल्ली एनसीआर, उत्तर प्रदेश, हरियाना, राजस्थान, उत्तराखंड अश्या राज्यात सुशील आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेतला पण सुशील कुमार पोलिसांच्या हाती लागला नाही असे समजते.