असे रिअ‍ॅक्टिव्हेट करा आपले आधारकार्ड?


भारतातील ग्राह्य ओळखपत्रांपैकी आधारकार्ड हे एक असून आधारकार्डवरील 12 आकडी क्रमांक सरकारी सवलतींचा फायदा, आर्थिक घेवाणदेवाण यामध्ये केवायसीसाठी देणे अनिवार्य असतो. पण आधारकार्डाचा 3 वर्ष वापर न केल्यास ते डिअ‍ॅक्टिव्हेट होऊ शकते. म्हणजेच केवळ नोंदणी करणे पुरेसे नाही त्याचा वापर करणेही आवश्यक आहे. अन्यथा आधार कार्ड बंद होते ही माहिती अनेकांना नसते.

आधारकार्डाचे स्टेट्स पाहण्यासाठी तुम्हांला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट म्हणजे uidai.gov.in ओपन करावी लागेल. आधार सर्व्हिसच्या टॅबखाली ‘व्हेरिफाय आधार नंबर’ चा UIDAI च्या होमपेजवर पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा म्हणजे नवे पेज उघडेल. तुमचा आधारक्रमांक आणि कॅप्चा वर्ड नव्या पेजवर टाकून ते व्हेरिफाय करावे लागेल. यानंतर हिरव्या रंगाचं चिन्ह दिसल्यास तुमचं आधारकार्ड अ‍ॅक्टिव्ह आहे. लाल चिन्ह दिसल्यास ते डिअ‍ॅक्टीव्हेट असेल. तुमचे आधारकार्ड डिअ‍ॅक्टिव्हेट असेल तर ते अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी आवश्यक कागदपत्र घेऊन जवळच्या एनरोलमेंट सेंटरमध्ये जा. आधार अपडेट फॉर्म भरा. बायोमेट्रिक पुन्हा व्हेरिफाय करा. 25 रूपये फी भरून तुम्हाला हे अपडेशन करून मिळेल. या प्रक्रियेदरम्यान आपल्याला एक व्हॅलिड मोबाईल नंबर द्यावा लागेल.

आधार कार्ड हे महत्त्वाचे ओळख पत्र असून बँक अकाऊंट्सपासून, पीएफ अकाऊंट सोबत त्याला लिंक करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये पॅन कार्ड सोबत लिंक करणे देखील आवश्यक आहे. सरकारी सुविधांचा उपभोग घेण्यासाठी आधार कार्ड अ‍ॅक्टीव्ह असणे आवश्यक आहे.

Leave a Comment