एकाच बिल्डींगमध्ये आहे शाळा, चर्च, रुग्णालय आणि पोलीस ठाणे !


तुम्हाला जर कोणी असे सांगितले की, एका इमारतीतच अवघे शहर वसले आहे, तर तुमचा यावर विश्वास बसेल का? नक्कीच बसणार नाही. कारण शहर हे मोठे जागेत वसले जाते. त्यात वेगवेगळ्या नागरी सुविधा पुरविल्या जातात. पण आम्ही आज तुम्हाला एका अशा शहराबद्दल सांगणार आहोत, जे कदाचित तुम्ही पाहिले आणि ऐकलेही देखील नसेल. हे शहर चक्क एका बिल्डींगमध्ये वसले असून त्यात कोणत्याही नागरी सुविधांची कमतरता नाही.

व्हिटिअर हा एक अमेरिकेतील उत्तर भागातील राज्य अलास्कामधील छोटा परिसर आहे. आपल्या वसाहती आणि व्यवस्थेसाठी हे ठिकाण जगभरात प्रसिद्ध आहे. एक १४ मजल्यांची इमारत या परिसरात आहेत. ‘बेगिच टॉवर’ असे या इमारतीचे नाव आहे. व्हर्टिकल टाऊन असेही या ठिकाणाला म्हटले जाते.

२०० परिवार या एकमेव इमारतीत राहतात. या इमारतीची खासियत म्हणजे यात केवळ लोक राहतात असे नाही तर त्यांच्या आवश्यकतेनुसार आणि गरजेनुसार सर्व गोष्टींच्या येथे सुविधा आहेत. पोलीस स्टेशन, आरोग्य केंद्र, स्टोर्स, लॉन्ड्री आणि चर्च हे सगळे या इमारतीत आहे. या इमारतीत काम करणारे सर्व कर्मचारी आणि इमारतीचा मालक याच इमारतीत राहतात. या इमारतीत त्यामुळेच इतर इमारतींच्या तुलनेत अधिक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.

ही इमारत शीतयुद्धावेळी सैनिक बराक म्हणूण वापरत होते. पण येथे नंतर लोक राहू लागले. येथे राहणाऱ्या लोकांची जीवनशैली इतर ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत फार वेगळी आहे. या परिसरातील वातावरणही नेहमीच फार खराब असतं, त्यामुळे हे लोक फार जास्त बाहेर जाऊ-येऊ शकत नाहीत.

Leave a Comment