पूर्व इंडोनेशियात आहे आई नसलेले गाव !


असे म्हटले जाते की घराला घरपण हे केवळ आईमुळेच मिळते. त्यातच आपल्याकडील सर्वांच्याच घरात आई ही असतेच. त्यातच घराची आईविना कल्पना करणे शक्यच होणार नाही. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा गावाबद्दल सांगणार आहोत जेथे आई तर आहे पण तिची माया तिच्या लेकरांना मिळत नाही. हे गाव पूर्व इंडोनेशियात असून या गावातील जवळपास सर्वच माता दुसऱ्या देशांमध्ये नोकरी करण्यासाठी गेल्या आहेत. या गावाला इंडोनेशियातील लोक आई नसलेले गाव असे म्हणतात. मुला-मुलींची आता गावात आईच नाही म्हटल्यावर वडिलांवर त्यांना सांभाळण्याची जबाबदारी आहे. जास्तीत जास्त घरांमध्ये हीच स्थिती असल्याने शेजारी एकमेकांच्या मुला-मुलींना सांभाळण्यास मदत करतात.

(छायाचित्र सौजन्य-बीबीसी)
यासंदर्भातील वृत्त बीबीसीने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार सांभाळ करणारी आईच आता नाही म्हटल्यावर रोजच्या जगण्यात येथील मुला-मुलींना अनेक अडचणी येतात. येथे काही मुले-मुली असेही आहेत ज्यांचे आई आणि वडील दोघेही परदेशात नोकरी करण्यासाठी गेले आहेत. राहण्याची आणि शिक्षणाची सोय असलेल्या संस्थांमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. येथील स्थानिक महिला आणि मायग्रेंट संस्थांकडून अशा शाळा चालवल्या जातात.

(छायाचित्र सौजन्य-बीबीसी)
महिलांचा जास्तीत जास्त परदेशात नोकरीला जाण्याचा उद्देश हा आपल्या मुला-मुलींना चांगले जीवन देण्याचा आहे. शेती आणि मजूरी करून येथील जास्तीत जास्त पुरूष हे घर चालवतात. तर परदेशात या महिला घरगुती कामे किंवा लहान मुलांना सांभाळण्याचे काम करतात. या भागातून महिलांचे परदेशात जाणे १९८० पासून सुरू झाले.

(छायाचित्र सौजन्य-बीबीसी)
परदेशात नोकरी करणाऱ्या काही महिला घरी परत येतात. कारण त्यांच्यावर अनेकदा गैरवर्तन, अत्याचार होतात. याबाबत काही नियमही तिकडे नाहीत. कधी कधी तर काही महिला थेट मृतावस्थेत गावी आणल्या जातात. तर कामाच्या काही महिलांना ठिकाणी मारझोड केली जाते. तसेच कामाचा मोबदला न देताच काही महिलांना परत पाठवले जाते. त्यांच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले जातात. त्यामुळे गावातील मुला-मुलींच्या दिसण्यातही फरक दिसून येतो.

(छायाचित्र सौजन्य-बीबीसी)
येथील १८ वर्षांची फातिमा दुसऱ्या मुला-मुलींपेक्षा वेगळी आहे. तिला लोक वेगळ्या नजरेने बघतात. तिला लोक म्हणतात की, ती फार सुंदर आहे कारण तू अरब आहेस. यावरून शाळेत तिला चिडवले सुद्धा जाते. याबाबत फातिमा सांगते की, तिच्या सौदीमध्ये राहणाऱ्या वडिलांना तिने कधीच पाहिले नाही. पण मला ते पैसे पाठवत होते. त्यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे आता आमचे जगणे फार कठीण झाले आहे. सौदी अरबमध्ये तिच्या आईने दुसरी नोकरी शोधली आहे.

(छायाचित्र सौजन्य-बीबीसी)
तर याबाबत दुसरी तरूणी एली सुसियावटी सांगते की, मी ११ वर्षांची जेव्हा होती माझी आई तेव्हा मला आजीकडे सोडून गेली होती. आई-वडील वेगळे झाल्याने मला आईकडे सोपवण्यात आले होते. सौदी अरबमध्ये आई मार्शिया हेल्परची नोकरी करते. एली ही वानासाबा नावाच्या गावात जाते आणि ती शाळेत शिकते आहे.

Leave a Comment