मायक्रोवेव्हमधील पोषक तत्त्व नष्ट झालेले पदार्थ खाण्याने होतात ‘हे’ गंभीर आजार


आपल्याकडे यापुर्वी हाताने जेवण बनवले जायचे, आता देखील बनवले जाते. पण बाजारात आलेल्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तुमुळे आता सहज कोणतेही खाद्यपदार्थ बनवले जाऊ शकतात. पण हे पदार्थ तयार करताना अनेकदा आपण त्यातले पोषक तत्त्व नष्ट करतो. मग ते पोटात गेल्यानंतर तुमच्या पोटासाठी घातक ठरतात. मायक्रोवेव्हमध्ये केलेले असे काही पदार्थ आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जे तुमच्या पोटासाठी घातक ठरू शकतात.

मायक्रोवेव्हमध्ये तयार केलेले पॉपकॉर्नमधून परफ्लूरोकटनॉइक अॅसिड निघते जे पोटात गेल्यानंतर त्याचे विष बनते. यामुळे कॅन्ससुद्धा होऊ शकतो. थंड झालेला भात जर तुम्ही खात असाल तर तुमचे पोट त्यामुळे खराब होऊ शकते. बॅक्टेरिया भातावर लवकर जमा होतात. त्यामुळे थंड झालेला भात तुमच्या पोटासाठी घातक ठरू शकतो.

तेल स्वयंपाक करताना लागतेच. तळण्यासाठी एकदा वापरलेले तेल तुम्ही परत परत वापरत असाल तर तुमच्या पोटासाठी ते अतिशय घातक ठरू शकते. शिजवलेले बटाटे जर थंड करण्यासाठी उघड्यावर ठेऊ नका कराण त्यावर लगेच बॅक्टेरिया जमा होतात आणि ते तुमचे पोट खराब करू शकतात.

एकदा शिजवलेले बटाटे तुम्ही परत गरम करत असाल तर ते सुद्धा आरोग्यासाठी घातक हानिकारक ठरतात. जळलेले ब्रेडसुद्धा तुमच्या पोटासाठी हानिकारक ठरू शकते. एक्रीलामाइड पदार्थ जळलेल्या ब्रेडमधून निघतो ज्यामुळे तुम्हाला पोटाचा आजार होऊ शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment