सासुबाईंसमोर ही वाक्य आवर्जुन टाळा


प्रत्येक नववधुच्या डोळ्यासमोर ‘सासू’ हा शब्द उच्चारला तरी रागट, खाष्ट, सतत चिडणारी, भांडण करणारी अशी व्यक्ती उभी राहते. रिअलिटी शो प्रमाणे आपली सासू असावी अशी अपेक्षा लग्नाआधी मुलींची असते. पण अनेक मुलींचा लग्नानंतर अपेक्षाभंग होतो. लग्नानंतर नवऱ्याबरोबरच सासूचेही मन प्रत्येक मुलीला जपावे लागते. नववधुला सासूच्या हव्या नको त्या गोष्टी पाहाव्या लागतात. सासू सूनेची या गोष्टी करुनही कित्येकदा भांडण होतात. तुमच्याकडून यावेळी भांडणात नकळत काही वाक्यांचा वापर केला जातो. पण या वाक्यांचा वापर तुम्ही टाळलात, तर तुमच्या सासूबाई तुमच्याशी अगदी रिआलिटी शोमधील सासुबाईंप्रमाणे प्रेमाने वागू शकते.

सासूशी कधी कधी सहजच किंवा भांडण झाल्यानंतर मुली उद्धटपणे बोलतात. त्यावेळी तुमच्या मुलाला मी तुमच्यापेक्षा चांगलेच ओळखते, हे वाक्य बहुतेकदा म्हटले जाते. पण सासरी गेल्यानंतर प्रत्येक मुलीने या वाक्याचा वापर सहसा टाळावा. कारण कोणत्याही आईला तिच्या मुलाच्या सर्व सवयी माहिती असतात. तसेच तुम्ही त्या दोघांना हे वाक्य बोलल्यामुळे वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहात असा गैरसमजही तुमच्या सासूच्या मनात निर्माण होतो. त्यामुळे सासू-सूनेच्या नात्यात मतभेद होऊ शकतात.

नवरा-बायकोची लग्नानंतर क्षुल्लक कारणावरुन वाद होतात. घरातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणून सासू हे वाद मिटावे यासाठी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते. कित्येकजणी त्यावेळी तिचे काहीही न ऐकता, आमच्या नवरा-बायकोचे हे भांडण आहे, त्यात तुम्ही ढवळाढवळ करु नका, असे सांगतात. पण तुमच्या सासूला असे बोलल्याने राग येऊ शकतो. त्यामुळे सासू सल्ला द्यायला आल्यानंतर तिचा सल्ला ऐकून घ्या, त्याचा स्वीकार करायचा की नाही हे तुमच्यावर आहे.

अनेक महिला लग्नानंतर नोकरी करतात. त्यांना नोकरीमुळे मुलांकडे व्यवस्थित लक्ष देता येत नाही. अशावेळी सासू किंवा सासऱ्यांकडे नातवंडांना सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी दिली जाते. पण कित्येकदा लहान मुले खूप मस्ती करतात. यामुळे तुम्ही घरी गेल्यानंतर तुमची सासू तुम्हाला मुलाने केलेले पराक्रम सांगू लागते. काही मुली अशावेळी फटकळपणे मी माझ्या मुलांना व्यवस्थित सांभाळू शकते, असे सांगतात. तुमची सासू यामुळे तुमच्यावर नक्कीच रागवू शकते.

आपल्याला आईने केलेल्या जेवणाची चव लग्नापूर्वी मुलींना आवडते. पण तोच पदार्थ लग्नानंतर सासू तयार केला, तर मुली नाक मुरडतात. सासू केलेला पदार्थ न खाताच तुम्हाला जेवण बनवता येत नाही, माझी आई तुमच्यापेक्षा फार उत्तम जेवण बनवते असे टोमणे मारण्यास सुरुवात करतात. पण सासू-सूनच्या नात्यात यामुळे मतभेद निर्माण होतात. सासूने केलेला एखादा पदार्थ तुम्हाला आवडला नाही, तर तिला पोट दुखत आहे किंवा डायटिंगवर आहे हे कारण देऊन तुम्हाला टाळता येऊ शकते.

Leave a Comment