अभिनेत्री कंगना राणावतला कोरोनाची लागण


आता अभिनेत्री कंगनाच्या नावाची बॉलिवूडमधील कोरोनाबाधितांच्या यादीत भर पडली आहे. आपल्याला कोरोनाची लागण झाली असून आपण हिमाचल प्रदेशमध्ये क्वारन्टाईन असल्याची माहिती तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिली आहे. आपण या काळात कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत असल्याचेही तिने सांगितले आहे.

कंगनाने आपला ध्यानधारणा करतानाचा एक फोटो शेअर करत सांगितले आहे की, गेल्या काही दिवसांपासून तिला डोळ्यांची जळजळ आणि अशक्तपणा जाणवत होता. आपण हिमाचल प्रदेशमधून बाहेर पडणार होतो, त्यावेळी कोरोना चाचणी केली आणि आपला अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे तिने सांगितले.


सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये, मी स्वत:ला क्वारन्टाईन करुन घेतले असून मला माहित नव्हते की माझ्या शरीरात हा व्हायरस पार्टी करत आहेत. आता मी त्याला संपवणार आहे. आपण कोणीही अशा गोष्टींना थारा देऊ नका. जर आपण या गोष्टीला घाबरलो, तर ते आपल्याला जास्त घाबरवतील. कोरोना हा फक्त एक फ्लू आहे, ज्याने काही लोकाच्या मनामध्ये भीती निर्माण केली आहे. आपण त्याला संपवून टाकू. हर हर महादेव, असे कंगनाने लिहिले आहे.