सोनी एक्स्पिरीया प्रो लाँच, किंमत २.३० लाख

प्रोफेशनल फोटोग्राफर्स, कंटेंट क्रिएटर्स, शॉर्ट फिल्म मेकर्सना अत्यंत उपयुक्त आणि नेहमीच्या सर्व जरुरी कामासाठी उत्तम असा फ्लॅगशिप फोन सोनीने एक्स्पिरीया प्रो नावाने बाजारात आणला असून सध्या तो फक्त युरोप बाजारात उपलब्ध केला गेला आहे. या फोन मध्ये अॅडव्हान्स फिचर समवेत अनेक अन्य खुब्या आहेत. आकर्षक लुक आणि पॉवरफुल फिचर्स असलेल्या या फोनची किंमत साधारण २ लाख ३० हजार रुपये आहे.

एचडीएमआय पोर्ट असलेला कंपनीचा हा पहिलाच फोन आहे. या फोनला ६.५ इंची ४के ओलेड डिस्प्ले कॉर्निंग गोरील्ला ग्लास ६ चे प्रोटेक्शन दिले गेले आहे. स्नॅपड्रॅगन ८६५ एसओसी प्रोसेसर, १२ जीबी रॅम, ५१२ जीबी स्टोरेज, फास्ट चार्जिंग सपोर्ट बॅटरी अशी फिचर्स आहेत. गरज असेल तेव्हा या फोनचा वापर व्हिडीओ स्ट्रीमिंग डिव्हाईस किंवा व्हिडीओ मॉनिटर म्हणून सुद्धा करता येणार आहे. या फोनला रिअरला ट्रिपल कॅमेरा सेटअप असून १२ +१२ +१२ एमपीचे प्रायमरी, वाईड अँगल आणि डेप्थ सेन्सर आहेत. सेल्फी साठी ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे.

या वर्षी जानेवारी मध्येच सोनीने एक्स सिरीज जगासमोर सादर केली होती. सोनीला युरोप मध्ये मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे हे नवे फोन युरोप बाजारात दाखल झाले असून युके मध्ये या फोनची किंमत २२९९ पौंड म्हणजे २.३५ लाख रुपये तर अन्य युरोप बाजारात २४९९ युरो म्हणजे २ लाख २३ हजार आहे.