आपल्या सामान्यज्ञानात घालूया थोडीशी भर


शिंकणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. नवजात बाळापासून ते अगदी वयस्क माणसांपर्यंत सर्व लोक शिंकतात. पण तुम्हाला हे माहिती नसेल कि शिंक येताना माणसाचे हृद्य धडकणे १ मिलीसेकंदाने थांबते. तसेच कितीही काळ आपण जागे राहू शकतो अशी बधाई अनेक जण मारतात पण प्रत्यक्षात ११ दिवसांपेक्षा अधिक काळ कुणी जागू शकत नाही. आपल्या शरीरात लोहाचे प्रमाण इतके असते कि त्यापासून एक इंच लांबीचा खिळा बनू शकेल. माणसाचा मेंदू ८० टक्के पाण्याचा बनलेला असतो तर माणसाची रक्त २१ दिवस साठवून ठेवता येते. जखमेवर साखर लावली तर वेदना त्वरित कमी होतात. मध शेकडो वर्षे चांगल्या स्थितीत राहतो.


प्रत्येक माणसाच्या बोटांचे ठसे जसे वेगळे असतात तसेच प्रत्येकाच्या जिभेचा ठसाही वेगळा असतो. जीभ हा माणसाचा सर्वात मजबूत स्नायू आहे. माणसाचे रोज २०० केस गळतात तसेच बहुतेक माणसात डावा पाय उजव्या पायापेक्षा किंचित मोठा असतो. आपल्या दाताचा वरचा जबडा शरीरातील सर्वात मजबूत भाग आहे. आपण जर उजव्या हाताने खात असू तर घास चावताना जबड्यातील उजव्या दातांचा वापर करतो. मानवी मेंदूची साठवण क्षमता म्हणजे मेमरी विकीपिडियावर असलेल्या माहितीच्या पाच पटीने अधिक आहे. आपल्या घामाला वास नसतो, जो वास येतो तो शरीरावरील बॅकटेरिया मुळे निर्माण होतो. बहुतेक हुशार लोक स्वतःशीच जादा बोलतात.


फेसबुकचा संस्थापक मार्क जुकेरबर्ग कडे कॉलेजची पदवी नाही. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दोन नंबरवर असलेले बिल गेट्स सेकंदाला १२ हजार रु.कमावतात. आनंदात असणाऱ्या माणसांच्या तुलनेत त्रासलेले लोक अधिक पैसे खर्च करतात. आपण विचार करणे थांबवू शकत नाही. काही किडे अन्न मिळाले नाही तर स्वतःलाच खातात.


प्राणी जगतात वेगाने धावणारे कांगारू उलटे चालू शकत नाही. हत्ती उडी मारू शकत नाही. घोडा उभ्याने झोपू शकतो. शहामृगाच्या मेंदूपेक्षा त्याचे डोळे मोठे असतात. झुरळाचे डोके कापले तरी ती कित्येक दिवस जिंवंत राहू शकतात. वटवाघाळे गुहेतून बाहेर पडली की प्रथम डाव्या दिशेने जातात. हंसाच्या शरीरावर २५ हजार पिसे असतात. उंटाच्या दुधाचे दही लागत नाही.


कोकाकोलाचा मुळचा रंग हिरवा होता. लायटरचा शोध काडेपेटीच्या आधी लागला आहे. जगात सफरचंदाच्या इतक्या जाती आहेत, की रोज एक जातीचे सफरचंद खाल्ले तर संपूर्ण जातींच्या सफरचंदांची चव घेण्यास २० वर्षे लागतील.

Leave a Comment