टकलू असाल आणि करोना झाला तर धोका जास्त

करोना साथीने जगभर हैदोस मांडला आहे. भारताची परिस्थिती फारच चिंताजनक आहे पण अश्यावेळी एक नवीन रिपोर्ट समोर आला असून त्यामुळे करोना उपचार करताना आणखी काय काळजी घेता येईल ते स्पष्ट झाल्याचे सांगितले जात आहे.

नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की, करोना झाला आहे असे रुग्ण जर टक्कल पडलेले असतील तर त्यांची तब्येत गंभीर होण्याचा धोका जास्त आहे. ज्या पुरुषांमध्ये मेल हार्मोन लेव्हल २२ पेक्षा जास्त आहे असे रुग्ण सर्वसामान्य करोना रुग्णाच्या तुलनेत अडीच पट अधिक गंभीर आजारी झाले असे दिसून आले आहे. यासाठी ज्यांचे निरीक्षण केले गेले त्या ६५ रुग्णांना अनुवांशिक टक्कल पडले आहे.

डेली मेलच्या बातमीनुसार या संदर्भात तज्ञांनी अनुवंशिकता व डीएनए सँपलिंग केले. टकलाचा प्रकारही लक्षात घेतला. याला अँड्रोजेनिक अॅलोपेशिया म्हटले जाते. जगातील ५० वर्षाच्या वरचे ५० टक्के पुरुष या प्रकारच्या टकलाची शिकार आहेत. त्यांच्यात अँड्रोजेन या रसायनाचे प्रमाण वाढते. पुरुषांच्यात टक्कल पडण्याची प्रक्रिया या अँड्रोजेन रीसेप्टर कडून कंट्रोल होत असते. हे रसायन टीएमपीआर एसएसटू एन्झाईमशी जोडलेले असते आणि हे एन्झाईम करोना संक्रमणात महत्वाची भूमिका बजावते असा हा संबंध आहे.