जगापासून अलग तरीही पर्यटकांचे आकर्षण बनलेला देश


गेली २८ वर्षे जगापासून अलग पडलेला तरीही जगभरातील पर्यटकांचे आकर्षण बनलेला देश म्हणजे मध्य आशियातील तुर्कमेनीस्तान हा देश होय. उत्तर कोरिया हाही जगापासून असाच तुटलेला देश आहे पण तुर्कमेनिस्तान इतके आकर्षण त्या देशाला नाही. १९९१ मध्ये हा देश सोविएत युनियनचा घटक होता मात्र आता हा स्वतंत्र देश बनला असला तरीही येथे हुकुमशाही असल्याने देशातील नागरिक खुलेपणाने बोलू शकत नाहीत. इतकेच काय त्यांच्या बोलण्या फिरण्यावर, फोटोग्राफी करण्यावर बंधने आहेत. येथील नागरिक उगीचच एका थाकानाहून दुसरीकडे जाऊ शकत नाहीत. मिडिया हा प्रकार या देशात नाहीच.


या देशात जागोजागी राष्ट्रपतींची पोस्टर आहेत. नागरिकांना कायद्याने अधिकार जवळजवळ नाहीत मात्र अनेक सुविधा आहेत. येथील ६७ टक्के लोक तुर्किश आहेत आणि त्यांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. या देशाची राजधानी आहे अश्गाबाद. येथे संगमरावरी हवेल्या, कारंजी, सोन्याचे पुतळे, संग्रहालये आणि भुरळ घालणारे बाजार याची रेलचेल आहे. या वाळवंटी देशात अनेक सुंदर ओअॅसीस आहेत. काराकुराम जवळ रशियन संशोधकांच्या चुकीमुळे अजूनही ज्वाला फेकणारे नरकाचे द्वार किंवा गेट ऑफ हेल आहे. हे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात.


या गेटची हकीकत अशी की काही रशियन भूगर्भ शास्त्रज्ञ येथे ड्रिलिंग करत होते तेव्हा नैसर्गिक वायू बाहेर आला. हा बावू विषारी असावा अश्या समजुतीने तो पेटविला गेला. ही आग काही दिवस, काही महिने यात नक्की विझणार अशी खात्री दिली गेली होती मात्र कित्येक वर्षे होऊनही ही आग अजूनही धुमसते आहे.


या देशातील लोकांना बॉलीवूडचे भयंकर वेड असून येता जाता कधीही येथे हिंदी गाणी कानावर पडतात. मुलांना त्यामुळे येथे हिंदी भाषेचे शिक्षण दिले जाते. या देशात जाण्यासाठी वसंत आणि हिवाळा हे दिवस चांगले कारण त्यावेळी तापमान थोडे सुसह्य असते. नरकाचे द्वार मानल्या गेलेल्या क्रेटर जवळ तंबूत मुक्काम टाकून रात्री राहता येते. या देशाची लोकसंख्या ५० लाख असून सोविएत संघातून बाहेर पडताना स्पारमाउत नियाजोव यांनी सत्ता खेचून घेतली असून देशात हुकुमशाहीचा पाया घातला आहे. येथील नागरिक आता त्यांच्या अधिकारांसाठी संघर्ष करण्याच्या तयारीत आहेत.

Leave a Comment