उत्तररात्री होतात सर्वाधिक मृत्यू


जन्माला येणारा प्रत्येक जीव कधी ना कधी मरणार हे सत्य प्रत्येकजण जाणून असतो तरीही मृत्यू म्हटले कि माणसाच्या मनात भीती निर्माण होते. कुणाला कुठल्या वेळी न परतीच्या वाटेचा हा प्रवास सुरु करावा लागेल हे कुणीच सांगू शकत नाही त्यामुळे मृत्यू संदर्भात अनेक प्रकारची संशोधने जगभरात सुरु असतात. जगात सर्वाधिक मृत्यू होण्याची वेळ कुठली यावर केलेल्या संशोधनात असे आढळले आहे कि दिवस आणि रात्रीत उत्तररात्र म्हणजे पहाटे तीन ते चार या वेळात मृत्यू येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. आकडेवारी सांगते ही वेळ मृत्यूदेवाला कदाचित अधिक प्रिय असावी कारण या वेळात माणसाचे शरीर सर्वाधिक कमजोर बनलेले असते.


जगात अनेक धर्म, पंथ, संप्रदाय आहेत आणि त्यांच्या विविध संस्कृती आणि मान्यता आहेत. त्यात बहुतेक सर्वांनी रात्रीचा तिसरा प्रहर धोकादायक असतो हे मान्य केले आहे. मेडिकल सायन्सनुसार हीच वेळ दम असणाऱ्यांना अॅटॅक येण्याची सर्वाधिक शक्यता असलेली वेळ आहे. या वेळात अॅटॅक येण्याची शक्यता ३०० पटीने अधिक असते असे दिसून आले आहे. यामागचे कारण असे दिले गेले आहे की या वेळात अँड्रेनेलीन व अँटी इन्फ्लेमेटरी हार्मोन चे उत्सर्जन माणसाच्या शरीरात कमी होते त्यामुळे श्वसनमार्ग थोडा आक्रसलेला असतो. या वेळेत दिवसाच्या तुलनेत रक्तदाबही कमी असतो.

या संशोधनात असेही दिसले कि १४ टक्के माणसाना त्यांच्या जन्मदिवशी म्हणजे वाढदिवसाला मृत्यू येतो. एकदम मोठ्या प्रमाणावर पैसे मिळाले तर १३ टक्के लोकांना मृत्यू येतो. गेली ४० वर्षे वैद्यकीय व्यवसाय करत असेलेले डॉ. असरानी यांनी मात्र हार्टअॅटॅक येण्याचे प्रमाण सकाळी ६ ते १२ या वेळात अधिक असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले रात्री झोपतानाही अनेकांना हार्टअॅटॅक येतो आणि स्लीप इम्निया हे त्यामागचे कारण असू शकते. यात झोपताना माणसाचा श्वास अचानक थांबतो.

Leave a Comment