जेफ बेजोसच्या ब्ल्यू ओरिजिनची प्रवाशांना अंतराळ प्रवासावर नेण्याची तयारी

जेफ बेजोस यांच्या ब्ल्यू ओरिजिन कंपनीने प्रवाशांना अंतराळ प्रवासावर नेण्याची तयारी केली असून २० जुलैच्या अंतराळ सफारीसाठी न्यू शेफर्ड विमानाच्या पहिल्या उड्डाणासाठी लिलाव केले जाणार आहेत. पाच आठवडे लिलाव सुरु राहणार असून यातून जमा रक्कम कंपनीच्या फौंडेशन मध्ये दिली जाणार आहे. ही रक्कम विज्ञान आणि गणित शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी वापरली जाणार आहे.

चंद्रावर माणसाचे पहिले पाउल पडले ते २० जुलै १९६९ मध्ये. त्याचा ५२ वा वर्षापन दिन असल्याने ब्लू ओरिजिनने अंतराळ उड्डाणासाठी २० जुलैची तारीख निवडली आहे. यात प्रवासी ११ मिनिटाचा अंतराळ प्रवास करू शकणार आहेत. पृथ्वीच्या वर १०० किमी वरून हा प्रवास होणार असून प्रवाशांना त्यासाठी चार दिवसांचा वेळ काढावा लागणार आहे. पाहिले तीन दिवस प्रशिक्षण दिले जाणार आहे.

ब्ल्यू ओरिजिनचे न्यू शेफर्ड रॉकेट अँड कॅप्सूल कॉम्बो एकावेळी ६ प्रवाशांना अंतराळात जाऊ शकतील या प्रकारे डिझाईन केले गेले आहे. ब्ल्यू ओरिजिनचे संचालक एरियान कॉर्नेल म्हणाले कंपनीने १५ रॉकेटचे उड्डाण परीक्षण आणि १६ कॅप्सूल लँडिंग चाचण्या घेतल्यावर या अंतराळ प्रवासाची तयारी केली आहे.

बेजोस यांच्या प्रमाणेच एलोन मस्क यांची स्पेस एक्स, रिचर्ड ब्रान्सन यांची व्हर्जिन गॅलेक्टिक होल्डिंग्स, या कंपन्या सुद्धा अंतराळ प्रवास स्पर्धेत आहेत.