नाशिक ऑक्सिजन गळती; ठेकेदार कंपनीसोबत महापालिकेने केलेला करारनामा सदोष


मुंबई : मागील महिन्यात नाशिकमध्ये डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती या घटनेच्या चौकशीसाठी नेमली होती. राज्य सरकारला या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. घडलेली दुर्घटना हा अपघात आहे, पण ठेकेदार कंपनीसोबत महापालिकेने केलेला करारनामा सदोष असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ऑक्सिजन प्लान्टसारख्या महत्त्वाच्या बाबींची देखभाल करताना कंपनीचे तंत्रज्ञ 24 तास हजर ठेवणे बंधनकारक असताना तिथे कुणीही हजर नव्हते. महापालिकेने केलेल्या करारात ऑक्सिजन प्लान्टवर 24 तास तंत्रज्ञ हजर ठेवण्याची अट टाकली नव्हती. महापालिकेने ठेकेदारास करार करताना 17 रुपये लिटरप्रमाणे ऑक्सिजन खरेदी करण्‍यास मान्यता दिली होती, त्यामुळे सर्व जबाबदारी त्या कंपनीची असल्याचा करारात उल्लेख आहे. 21 एप्रिलला झालेल्या दुर्घटनेत 24 जणांचा मृत्यू झाल्यानंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली होती.