महानगरपालिकेचा मुंबईकरांना मोठा दिलासा; सोसायटीमध्येच राबवता येणार कोरोना लसीकरण मोहिम


मुंबई – बृह्नमुंबई महानगरपालिकेने लसीकरणाच्या बाबतीत मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबईकरांना गेल्या काही दिवसांपासून सुरु करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेसाठी काही अडचणींचा सामना करावा लागत होता. लसीकरण केंद्रावरील गर्दी, लसींच्या तुटवड्याअभावी लांबलेल्या लसीकरणाच्या तारखा अशा अडचणींवर तोडगा म्हणून पालिकेने मुंबईकरांना एक चांगला पर्याय दिला आहे. मुंबईकरांना ज्याअंतर्गत लसीकरण केंद्रावर जाण्याचीही गरज लागणार नाही.

मुंबईतील सोसायट्यांमध्येच येत्या काही दिवसात कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करुन दिली जाण्याची शक्यता आहे. पालिकेकडून यासाठी सोसाट्यांना रितसर परवानगीही मिळू शकते. शहरातील मोठ्आ सोसायट्यांना मुंबई महापालिकेने खासगी रुग्णालयासोबत करार करुन लसीकरण मोहिम राबवण्याची परवानगी दिली आहे.

ही परवानगी जरी पालिकेने दिली असली तरीही सरसकट सर्व सोसायटींना यासाठीची परवानगी नसेल. ज्या सोसायटींना मोठे सभागृह आहे, जिथे लसीकरण प्रक्रियेदरम्यान गर्दी होणार नाही, लसीकरणासाठी ज्या सोसायटींमध्ये पुरेशी यंत्रणा आहे, अशाच सोसासटींना पालिकेकडून परवानगी देण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला शहरातील खासगी लसीकरण केंद्रावर लसी उपलब्ध नसल्यामुळे आता सोसायट्यांमध्ये लसीकरण मोहिम सुरु करायची झाल्यास ती केव्हा सुरु होणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.