कोरोनामुळे माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचे निधन


नवी दिल्ली : राष्ट्रीय लोक दलाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते 82 वर्षाचे होते. 20 एप्रिल रोजी अजित सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांची तब्बेत मंगळवारी रात्री अचानक बिघडल्यामुळे गुरुग्राम येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख असलेले अजित सिंह हे पश्चिम उत्तर प्रदेशचे महत्वाचे नेते होते. त्यांना फुफ्फुसाचे इन्फेक्शन झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यांच्या निधनाची वार्ता अजित सिंह यांचे पुत्र आणि माजी खासदार जयंत चौधरी यांनी दिली आहे.